AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मच्छिमाराच्या जाळ्यात शार्क अडकला, इतक्यात मगरीचा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ धक्कादायक असतात तर काही व्हिडीओ गंमतीदार असतात.

मच्छिमाराच्या जाळ्यात शार्क अडकला, इतक्यात मगरीचा हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO
shark-video
| Updated on: Mar 08, 2021 | 11:57 AM
Share

कॅनबरा : सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ धक्कादायक असतात तर काही व्हिडीओ गंमतीदार असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका धक्कादायक व्हिडीओबद्दल सांगणार आहोत, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका मगरीने पाणी हे तिचं साम्राज्य असल्याचं तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. (Crocodile Steals Shark Off Fisherman’s Line, Video Viral)

ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असलेल्या ज्योफ ट्रुटविन (Geoff Trutwin) आणि नॅट बार्न्स (Nat Barnes) हे दोघे पश्चिम किनाऱ्यावर मासेमारी करत होते. ज्योफने एक शार्क मासा पकडला, पण, जेव्हा त्याने शार्क आपल्याकडे खेचण्यास सुरवात केली, तेव्हा पाण्यात असलेल्या एका मगरीने अचानक शार्कवर हल्ला केला आणि तो मासा जबड्याने पकडला. मिळालेल्या माहितीनुसार ती मगर 8 फुट लांब होती. ज्योफने मगरीच्या जबड्यातून माशाला हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्या मगरीन् ज्योफ आणि नॅट या दोघांनाही शार्क सोडण्यास भाग पाडले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ही बातमी लिहीत असेपर्यंत तब्बल 2 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तुम्हीदेखील या मगरीने शार्कची शिकार कशी केली याचा हा व्हिडीओ पाहा.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

OMG! अचानक सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Video | मराठमोळ्या रिक्षावाल्याचं लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे लावणी नृत्य

दिल्ली पोलिसांवरही ‘पावरी गर्ल’चा जादू, छापेमारीनंतर व्हायरल झालं गमतीशीर ट्वीट

(Crocodile Steals Shark Off Fisherman’s Line, Video Viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.