वसंतदादा म्हणजे अल्पशिक्षित माणसातील अत्युच्च पातळीवरचं शहाणपण…

महाराष्ट्रातील गावागावात पुणे-मुंबईसारखी कॉलेजं निघाली, आणि शाळेला न जाणारी पिढीही मग अभियांत्रिकी करुन देशापरदेशात जाऊ लागली, ती सगळी देण आहे ती वसंतदादा पाटील यांची.

वसंतदादा म्हणजे अल्पशिक्षित माणसातील अत्युच्च पातळीवरचं शहाणपण...
Vasantdada PatilImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 2:52 PM

मुंबईः खेड्यापाड्यातील ज्या मुलांना चौथीनंतर शाळा शिकणं म्हणजे संकट वाटायचं, दहा दहा किलोमीटरची पायपीठ करुन सातवीपर्यंत शाळा शिकून नंतर कुठेतरी नोकरी करयाची हेच महाराष्ट्रातील (Maharashtra) गावागावात राहणाऱ्या पोरांच्या कथा. महाराष्ट्रातील गावागावात पुणे मुंबईसारखी कॉलेजं निघाली, आणि शाळेला न जाणारी पिढीही मग अभियांत्रिकी करुन देशापरदेशात जाऊ लागली, ती सगळी देण आहे ती वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची. वसंतदादा पाटील म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सलग चार वेळा मुख्यमंत्री राहिलेला नेता आणि गावाकडचा माणूस. वसंतदादा पाटील हे सांगली जिल्ह्यातील (Sangli District) पद्माळे या लहानशा खेड्यात 13 नोव्हेंबर 1917 रोजी दादांचा-वसंत बंडूजी पाटील यांचा जन्म झाला, आणि 1 मार्च 1989 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे सलग चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या वसंतदादा पाटील यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त…

वसंतदादा पाटील म्हणजे राजकारणातील ते दादा असले तरी त्यांच्यासारखा प्रेमळ आणि मायाळू माणूस राजकारणात भेटणं दुरापास्त होतं. त्यांच्या भेटीविषयी प्रा. ग. प्र. प्रधान यांनी एक ठिकाणी फार सुंदर आठवण लिहून ठेवलं आहे ते म्हणतात, एकदा दुपारी तीन वाजता मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. तेव्हा ते म्हणाले, ‘प्रधान, थोडे थांबा. भाकरी खाऊन घेतो. जेवायला वेळच झाला नाही.’ मी म्हणालो, ‘आपण शांतपणे जेवा. मी एक तासाने येईन.’ तेव्हा दादा हसून म्हणाले, ‘तुम्ही इथंच बसा, म्हणजे दुसरं कुणी आत येणार नाही.’ ‘भाकरी खाऊन घेतो’ अशी शब्दकळा मुखातून स्वाभाविकपणे उमटणाऱ्या दादांची शेती, शेतकरी, खेडीपाडी, ग्रामजीवन, सहकार यांच्याशी किती घट्ट नाळ जोडलेली असेल याची कल्पना आपण करू शकतो. वसंतदादांची राजकारणातील ही त्यांची खास शैली होती. गावा घरातील माणूस जसा व्यवहार ठेवतो तसाच व्यवहार त्यांनी प्रत्येक माणसांबरोबर जोडून ठेवला होता.

अनेक महत्वाचे निर्णय

गावागावात विखुरलेला प्रत्येक वसंतदादांसाठी महत्वाचा होता म्हणून आपण मुख्यमंत्री असताना राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले, त्या निर्णयामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय म्हणजे, मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन, या अशा निर्णयामुळे गावागावत राहिलेला महाराष्ट्रातील माणूस जगात चालू असलेल्या सिस्टीमचा भाग बनला. विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये काढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड बदल झाले, आणि त्यांच्यावर शिक्षणाच्या खासगीकरणाचा ठपकाही ठेवण्यात आला पण या सगळ्याला वसंतदादा यांनी समर्थपणे तोंड देत राज्यात बदल घडवून आणले.

पुढची पिढी शिकून सवरुन शहाणी व्हावी

शिक्षण क्षेत्रात केलेल्या बदलामुळे वसंतदादा पाटील यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली, पण वसंतदादांचे ही राजकारणा वेगळा दबदबा होता, त्यामुळे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचं जाळं बनले आणि आपल्या राज्यातील बाहेर जाणारा विद्यार्थी यामुळे राज्यातच शिक्षण घेऊ लागला. आजही ग्रामीण भागाकड लक्ष दिल्यावर डोंगर दऱ्याखोऱ्यांतून उभारलेल्या कॉलेजच्या टोलेजंग इमारती दिसतात, गर्द हिरव्यागार झाडीत दूरवर पसरलेला कॉलेज इमारतींची परिसर दिसतो आणि दिसत राहतात ती गावाकडची आणि शहरातील पोरं पोरी, जी नंतर नोकऱ्यांसाठी मग परदेशाची वाट धरतात, सुखी संपन्न आयुष्य जगतात, ती सगळी देण या ती गावाघरातून आलेला, शेतात राबणारा आणि सातवीपर्यंत शिक्षण होऊन राज्यातील पुढची पिढी शिकून सवरुन शहाणी व्हावी म्हणून धडपडणाऱ्या ‘पद्मभूषण’ वसंतदादा पाटील यांची.

तुरुंगातून धाडसी पलायन

वसंतदादा पाटील यांचा राजकारणात त्याकाळी दबदबा निर्माण झाला असला तरी तो सहज प्राप्त झाला नव्हता. वसंतदादा हे शिक्षणाची परंपरा नसलेल्या, लहानशा खेड्यातील, शेतकरी कुटुंबातील एक तरुण मुलगा देशाच्या स्वातंत्र्यसमरात सहभागी होऊन देशासाठी जे जे करता येईल ते ते करत राहणं त्याला आवडते, म्हणून 1942 च्या चले जाव आंदोलनात स्वत:च्या ऐन पंचविशीत भूमिगत राहून इंग्रजांच्या विरोधात हातात शस्त्र घेतले आणि त्यानंतर त्यांना अटकही झाली. इंग्रजांनी अटक केल्यानंतर सांगलीच्या तुरुंगातून धाडसी पलायन केले, यासाठी काही पोलिसांच्या गोळ्याही त्यांनी झेलल्या, त्यामुळेच ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले. राजकारणात असले तरी समाजासाठीचा त्यांचा हेतू हा स्पष्ट होता. म्हणून वसंतदादा स्वातंत्र्यानंतर विधायक कामात अग्रेसर राहिले, सहकार आणि कृषी-औद्योगिक क्रांतीद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट केला आणि सामूहिक आर्थिक विकासाचं प्रारूप सिद्ध करत, सहकारमहर्षी म्हणून ते सन्मानितही झाले.

दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले…

भारताच्या राजकारणात काही मोजकीच जी माणसं होती, ज्यांना दीर्घकाळ आपले अस्तित्व आपल्या कामाच्या बळावर टिकावून ठेवता आले, त्यापैकी त्यातील दोन नाव म्हणजे त्यातील पहिलं नाव होतं, ते पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हौतात्म पत्करले तर वसंतदादा यांनी स्वातंत्र्यसंग्रामात छातीवर गोळ्या झेलल्या. वसंतदादा महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले तर इंदिरा गांधी देशाच्या पंधरा वर्षे पंतप्रधान होत्या. वसंतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकौशल्यावर आणि संघटनकौशल्याच्या जोरावर तळागाळापासून पक्षबांधणी करीत ते काँग्रेसचा अध्यक्ष झाले होते. म्हणून सदा डुम्बरे त्यांच्या एका लेखात म्हणतात की, “दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले, परंतु कारभारासाठी त्यांना सलग चार वर्षेही मिळू शकली नाहीत. पाच वर्षांची एक सलग इनिंग दादांना मिळाली असती, तर त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन अधिक नेकेपणाने आणि कठोरपणेही करता आले असते.”

कारखान्यात साखर तयार होत नाही, शेतात होते

दादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतः विकासाचा कार्यक्रम ठरवून घेतला म्हणून त्यांनी कारखाना, कृषी, औद्योगिक, सहकार यावर त्यांनी जोर देत केंद्र आणि राज्य सरकारतर्फे चालविणारा जाणारा विकासाचा कार्यक्रम त्यांना गावगाड्यापर्यंत पोहचवला. म्हणून ते म्हणतात ‘कारखान्यात साखर तयार होत नाही, शेतात होते. ऊस हा कच्चा माल. साखर उद्योगात साखरेहून किती तरी अधिक मोलाची, उपयोगाची, वरदान ठरू शकतील अशी उत्पादने मिळू शकतात. खरे तर त्यांची गणना करणे कठीण. साखर हेच उपउत्पादन ठरावे, एवढे ऊस हे पीक विलक्षण आणि बहुविध उपयोगाचे आहे.’’ हा त्यांचा भविष्यातील दूरदृष्टीकोन होता.

तथाकथीत अडाणी माणसाच्या शहाणपणाचा गौरव

म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ऊस आणि साखर उद्योगासंबंधीचे सर्वंकष संशोधन व विकासासाठी पुण्याजवळ डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची आणि साखर कारखान्यांचे व साखर उद्योगाचे देशपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची स्थापना केली. यासाठीच वसंतदादा पाटील यांचा गौरव करताना त्यांना यासाठीच ‘सहकारमहर्षी’ म्हटले जाते. देशातील 1952 पासूनच्या सगळ्या निवडणुका वसंतदादा यांनी जिंकल्या आहेत, त्या फक्त राजकीय हेतू ठेऊन जिंकल्या नाहीत तर त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या कामातून गती दिली होती. राजकारणातील या निरक्षर किंवा अल्पशिक्षित माणसाला महात्मा फुले कृषिविद्यापीठ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला गेला हा दादांधील तथाकथीत अडाणी माणसाच्या शहाणपणाचा गौरव होता.

संबंधित बातम्या

लवासाप्रकरणी पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार, मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का केली, सोमय्यांचे 3 सवाल

येवा कोंकण आपलोच आसा! कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात, कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार

युक्रेनमध्ये 4 मंत्री पाठवून इव्हेंट, यापूर्वीच सर्व मुलांना वाचवायला हवे होते; भुजबळांकडून मोदींना आहेर!

Non Stop LIVE Update
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.