प्रत्येक मुलगीत एक इंदिरा असते आणि प्रत्येक बापात एक नेहरु असतो; फक्त एवढच ते आपण वेळीच जाणलं पाहिजे…

अडचणीचा काळ असला की, नेहरु आपल्या मुलीला पत्र लिहित आणि दुःखाचे कारण सांगत म्हणून ते एका पत्रात म्हणता की, मुली वडिलांच्या चांगल्या मैत्रीणी झाल्यातर त्यांच्याएवढी जगात दुसरी कोणतीच मैत्री सुंदर नाही.

प्रत्येक मुलगीत एक इंदिरा असते आणि प्रत्येक बापात एक नेहरु असतो; फक्त एवढच ते आपण वेळीच जाणलं पाहिजे...
indiara neharu
Image Credit source: TV9
महादेव कांबळे

|

Mar 08, 2022 | 7:13 AM

मुंबईः इंदिरा गांधी पंतप्रधान ( Prime Minister Indira Gandhi) असताना पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या 80 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी एका विद्यापीठात आपले मनोगत केले होते, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, जवाहरलाल नेहरु यांना मी एक वडील आणि एक नेता म्हणून मानत असले तरी ते माझे एक चांगले मित्र (Friendships) होते. मी त्यांना माझा चांगला मित्र मानते ही माझी गोष्ट त्यांनाही माहिती होती. आपल्या मुलीचे हे शब्द कोणत्याही बापाला एकाद्या पुरस्कारापेक्षाही मोठे वाटतात, कारण मुलगी म्हणते की, माझे वडील माझे चांगले पप्पा होतेच पण त्याच बरोबर ते माझे चांगले मित्रही होते.

मुलींना वाढवण्यासाठा आणि त्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या भविष्यात पुढे जाण्यासाठी वडिलांनी तिच्यासाठी तिचा एक चांगला मित्र असे पाहिजे असे नेहरु सांगत. वडील आणि मुलगी यांच्यातील मित्रत्वाचे नाते हे मध्यवर्गीय कुटुंबात अवघडल्यासारखे मानले जाते. म्हणून मित्रत्वाचं नातं कुटुंबात अगदी लहान असल्यापासून समजून घेतले गेले पाहिजे.

पिढ्यांमधील एका सुंदर संवादाची लय

वडील आणि मुलगी यांच्यातील मित्रत्वाचे संबंध जाती, समुह, वर्ग आणि संस्कृतीच्या संकल्पनेत निरपेक्ष असू शकतात. वडील आणि मुलगीच्या मित्रत्वाचे संबंध म्हणजे दोन पिढ्यांमधील एका सुंदर संवादाची लय असते. या मित्रत्वाच्या नात्यावरच मग नवी पिढी उभारली जाते. शिकते आणि सावरतेही. कारण आपल्या बौद्धिक, सांसरिक आणि अध्यात्मिक जिज्ञासेतील सवाल जवाबाला आपल्या बालबुद्धीला पटतील न पटतील असे अनेक प्रश्न घेऊन मग ते आपल्या वेळनुसार कधीही विचारत राहते.

मानवतेच्या पातळीवरच मग नवी पिढी

अशी उदार आणि मानवतेच्या पातळीवरच मग नवी पिढी उभी राहत असते. चालणे आणि बोलणे शिकत नाही तर त्यांच्या बौद्धिक, प्रापंचिक आणि आध्यात्मिक जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बालपणात उत्स्फूर्तपणे अधूनमधून प्रश्न विचारले जातात. कधीकधी तर्कहीन वाटणाऱ्या, कृती किंवा निर्णयावर प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वासही त्यांना त्याच पातळीवर वाढतो, आणि मिळतो.

आध्यात्मिक जिज्ञासा पूर्ण

वडील आणि मुलीचे हे मैत्रीपूर्ण नाते जात, धर्म, वर्ग आणि संस्कृतीच्या सीमांपलिकेड गेलेले असते. दोन पिढ्यांमधील परस्पर संवादासाठी तो एक सुंदर मंचही असू शकतो. अशी उदार आणि मानवतेवर जी नवीन पिढी केवळ उभी राहते. चालणे आणि बोलणे शिकत नाही तर त्यांच्या बौद्धिक, प्रापंचिक आणि आध्यात्मिक जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बालपणात उत्स्फूर्तपणे अधूनमधून प्रश्न विचारणे देखील शिकते. कधीकधी तर्कहीन वाटणाऱ्या, कृती किंवा निर्णयावर प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वासही त्याच पातळीवर वाढतो.

निरपेक्ष अपेक्षांचा निरागसपणा

त्याच बालवयात आणि बालपणाच्या पातळीवर मग निरपेक्ष अपेक्षांचा निरागसपणाही वाढतो. काही अनपेक्षित काम करून पुढे जाण्याचा हट्टही याच वयात वाढतो. मग ही चेष्टा मस्करी वेगवेगळ्या वेळी बाप-लेकीच्या नात्यांपैकी कोणाचाही असू शकतो. ही मैत्री नेहमीच पारदर्शक असावी असेही नाही, त्यामुळे ती नैसर्गिकरित्या थोडी लपूनही राहते. ज्याप्रकारे दुसऱ्याच्या बागेतील निरपेक्षवृत्तीने आंबे आणि पेरू चोरून जी खाण्यात मजा आहे ती वेगळीच असते. तोच आनंद या नात्यात असतो. त्यामुळे तो आनंद आणखीनच द्विगुणित होतो. निरपेक्ष वृत्तीने केलेली चोरी बागेतील माळीलाही माहिती असते पण तो बघून न बघितल्याचे नाटक करतो आणि आपल्या चोरीकडे दुर्लक्ष करतो आणि गुपचूप पणे हसतो त्या क्षणाचा खरा आनंद हा वेगळाच असतो, आणि तोच आनंद बाप आणि लेक यांच्यातील मैत्रभावातील असतो.

मैत्री किती लोभस

निरपेक्ष वृत्तीतून आपल्या हातून झालेल्या आपले वडिलांना समजूनही त्या न समजल्याचं नाटक करतात, त्यावेळी आपले वडील म्हणजे त्या बागेतील निरागस माळ्यासारख्या भासत असतात. आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगातूनच मग वडिल आणि मुलगी यांच्यातील मैत्रीचं नातं वाढत जातं आणि कालांतराने ते बहरतेही. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नात्यात असलेली मैत्री त्यांनी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी अनुभवली. आणि एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून त्यांना एकमेकांना सांगितलीही. इंदिरेस लिहिलेल्या पत्रातून नेहरू आणि इंदिरा यांच्यातील नाते वडील आणि मुलगी असले तरी त्यांच्यातील मैत्री किती लोभस होती ते कळते.

त्याहीपेक्षा अधिकचा आनंद त्यांना मिळावा

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1929 मध्ये जेव्हा आपल्या अकरा वर्षाच्या एकुलती एका लेकीला इंदिरेला जेव्हा पत्र लिहिली आणि त्यानंतर ती पत्र जेव्हा पुस्तकरुपाने छापायला दिली. त्यावेळी त्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की, दहा वर्षाच्या माझ्या चिमुरडीला लिहिलेली ही खासगी पत्र होती. पण काही माझ्या मित्रांनी ही सगळी पत्रं पुस्तकरुपानं छापण्याचा सल्ला त्यांनी मला दिला असे म्हणतात. ती त्यानिमित्तानं सगळ्यांना वाचायला मिळतील असं म्हणून त्यांनी त्याचं पुस्तक काढण्याचा आग्रह धरला. त्या पुढे जाऊन नेहरू लिहितात की, ही पत्रं वाचून मुलं मुली याचं कौतूक करतील की नाही माहिती नाही पण मला आशा आहे की, त्यांच्यापैकी कुणीही पत्रं वाचतील तेव्हा ते नक्की आपल्या आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या जगाचा विचार करतील, आणि त्यांना वाटेल की या राष्ट्रातील आणि देशातील माझं घर म्हणजे एक मोठं कुटुंब आहे. ही पत्रं लिहिताना मला जितका आनंद मिळाला आहे, त्याहीपेक्षा अधिकचा आनंद त्यांना मिळावा.

गोष्टी सांगणारा बाप

पंडित जवाहरलाला नेहरु जेव्हा आपल्या अल्लड वयातील मुलीला पत्र लिहितात, तेव्हा त्यांना तिची बुद्धी अल्लड आणि बालबुद्धी वाटत नाही. आपल्या लेकीला पत्र लिहिताना त्या पत्रातील प्रत्येक शब्द हा मायेनं आणि ममतेनं भारलेला आहे. मुलीला लिहिलेल्या पत्रात नेहरू कधीच शिक्षक होत नाहीत, त्या पत्रातील नेहरु आपल्याला भेटतात ते घरात अंथरुणावर झोपताना लेकीचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन गोष्टी सांगणारा बाप भेटतो.

कधी कधी अंतिम उत्तर बदलूही शकतात

आपल्या लेकीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं ते उत्तर शोधत नाहीत, तर तिचं कुतुहल वाढवण्याचा प्रयत्न करतात. इंदिरेच्या प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर देत बसत नाहीत, त्यांना वाटतं की, इंदिरेनं स्वतःला वाचून, बघून आणि स्वतः जगून बघावं, आणि आणखी कुठूनतरी तिनं ते जाणून घ्यावं. आणि तिच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलंच तर त्या प्रत्येक उत्तरात ते कदाचित असाच शब्द उच्चारतात, कारण त्यांना ठाऊक आहे की, कधी कधी अंतिम उत्तर बदलूही शकतात.

बापलेकीच्या नात्यात मैत्रीचं रोपटं

म्हणून इंदिरा गांधीही आपल्या बापानं लिहिलेल्या प्रेमळ पत्रातून त्या शिकत राहतात, आणि म्हणूनच मग भविष्यातही त्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्या की त्या त्या प्रदेशाशी त्या सहज जोडून घेत असत. त्यांच्या प्रेमळ सल्ल्यातूनच तिला आयुष्यभर शिकवण मिळत राहिली, आणि म्हणूनच ती स्वतःचे तर्कशुद्ध आणि स्वायत्त निर्णय घेऊ लागली. आपल्या बापाच्या पत्राला उत्तर देतानाही ती छोट्या छोट्या गोष्टीसाठी पत्र लिहित राहते, पत्रातील तिची गोष्ट खूप छोटी आणि साधी असते पण आपल्या बापाला प्रश्न विचारताना ती खूप प्रांजळपणे त्यांना विचारते त्यावेळी तिच्या शब्दात कुठेही अतिआत्मविश्वास वाटत नाही. तर मैत्रीचं एक सहज रोपटं बापलेकीच्या नात्यात दिसत राहतं.

माझे मित्र माझी खूप काळजी घेतात

इंदिरा गांधी जेव्हा युरोपमध्ये शिकायला गेली त्यावेळी ती आपल्या बापाला पत्र लिहिते आणि सांगते की, काल दुपारी जाऊन मी केस कापून आले. डोक्यावर केसांची वेणी घालाताना दिवसांतून ती दहा दहा वेळा घालावी लागायची, आणि ती वेणी वारंवार सुटत राहायची. त्यामुळे माझी फार डोकेदुखी वाढलेली. याशिवाय ती वेणी युरोपियन केसांमध्ये अजिबात शोभत नाही. इथे युरोपमध्ये मित्र मैत्रीणींशी काहीही शेअर करायला अजिबात संकोच वाटत नाही, लिंगभेद आड येत नाही, पण येथील माझे मित्र माझी खूप काळजी घेतात. इंदिरेचे हे पत्र वाचून नेहरुंनीही मग खूप सहजतेने तिला पत्र लिहिले.त्यावेळी त्यांना कळले असेल आणि समजलेही असेल आणि कदाचित त्यांना समजले नसले तरी त्यांनी बागेतील माळ्यासारखं समजूनही न समजल्यासारखं केलं असेल. त्यामुळे त्यांची ही वैयक्तिक पत्र एकमेकांना लिहिली असली तरी मानवतेच्या अंगाने ती खूप विचार करायला लावणारी आहेत.

तुझ्याशिवाय तुला कोणीही हरवू शकत नाही

इंदिरा आणि नेहरु यांचा हा पत्रव्यवहार चालू असतानाच्या काळात अचानक एके दिवशी मुलगी मोठी होते आणि ती एका तत्वज्ञानाच्या स्वरात बोलू लागते. एक पालक म्हणून, ती आपल्या बापाला समजावून सांगते, आणि सांत्वनही करते. आपल्या बापाची प्रचंड काळजी घेते. वय वाढलं आणि मुलं मोठी झाली की, वडील मुलीच्या भूमिकेत आणि मुलगी वडिलांच्या भूमिकेत जाते. त्या काळातील इंदिरा गांधीकडे बघितल्यावर लक्षात येते की, 1939 च्या आसपास, जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय वातावरण तंग होते, त्याकाळात नेहरू तणावाखाली होते, तेव्हा इंदिरा त्यांना लिहितात; ‘माझ्या प्रिय पपू, तू इतका पराभूत होऊ नकोस, कारण तुझ्याशिवाय तुला कोणीही हरवू शकत नाही. भारतीय राजकारणात प्रवेश करणाऱ्यामधील अनेकांपैकी असलेल्यामध्ये तू खूप वरचा आहेस. राजकारणात की वाईट गोष्टी रुजलेल्या आहेत, ते बघून मला वाईट वाटते. पण त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. हे सगळं जगभर घडत आहे, फक्त एकच लक्षात ठेवा हा काळाही निघून जाण्यासाठी आलेला आहे.

मुलगी वडिलांची चांगली मैत्रीण

पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींच्या पत्रातून एकच कळते ते हे की, मुलगी जेव्हा वडिलांच्या भूमिकेत येते तेव्हा ती तितकीच त्यांची चांगली मैत्रीण झालेली असते. वडिलांच्या दुःखाच्या प्रसंगात, मग तो केवढाही मोठा असू दे मुली प्रेमळ आणि मायेच्या स्वरात तो काळ निभावून घेऊन जातात. वडिलांना सावरण्यासाठी मुलीच पुढे आलेल्या असतात, आणि त्याच त्या काळातील नेतृत्वाची दोरीही त्या हातात घेतात. म्हणून अडचणीचा काळ असला की, नेहरु आपल्या मुलीला पत्र लिहित आणि दुःखाचे कारण सांगत म्हणून ते एका पत्रात म्हणता की, मुली वडिलांच्या चांगल्या मैत्रीणी झाल्यातर त्यांच्याएवढी जगात दुसरी कोणतीच मैत्री सुंदर नाही.

एक बाप आपल्या मुलीचा एक चांगला मित्र होऊ शकतो

सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आणि ट्रोल वगैरेच्या भूमिकेत असणाऱ्या काहीही बरळणाऱ्या आजच्या तरुणांना एक दिवस अशाच मुलींचे आपण बाप होणार हे चांगलंच माहिती असायला हवं. म्हणून मग अमर्त्य सेन किंवा सुब्रमण्यम स्वामींना त्यांच्या मुलीचे नाव घेऊन लाजीरवाणा प्रकार करण्याचा प्रयत्न कुणी करणार नाही. त्या दिवशी त्यांना समजेल की या लोकांनी आपल्या मुलींना धैर्यवान, स्वावलंबी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी त्यांना का पुढं आणलं आहे. आणि एक सिद्ध केले आहे की, एक बाप आपल्या मुलीचा एक चांगला मित्र होऊ शकतो.

जगात प्रत्येक वडील नेहरू किंवा प्रत्येक मुलगी इंदिरा असणे आवश्यक नाही, परंतु प्रत्येक वडील आणि मुलीमध्ये नेहरू आणि इंदिरामध्ये जितकी चांगली मैत्री होती तितकी लोभस आणि प्रेमळ मैत्री असणे गरजेची आहे. येणाऱ्या पुढील काळात बहुसंख्य कन्या अनेक अर्थाने इंदिरांसारख्या होणार असतील तर बाप म्हणून आपल्या अंतर्यामी असलेल्या नेहरूंसारखं एक पत्र आपल्या लेकीलाही लिहा ज्यातून वडिलांच्या आत असलेल्या एका प्रेमळ मित्राचा मायाळू सल्ला असेल.

संबंधित बातम्या

सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे सिद्ध करणारे फुगे विकणाऱ्या मुलीचे खास फोटो

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला NMCची मान्यता, महापौरांच्या प्रयत्नांना यश

Sharad Pawar : 82 वर्षांचे शरद पवार कुस्तीच्या आखाड्यात म्हणतात, ‘अजून मी म्हातारा नाही’!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें