13 व्या शतकातील कविता बनली लता मंगेशकरांचं सदाबहार गाणं; हे इतकं गाजलं की थेट पाकिस्तानामध्ये…

13 व्या शतकात लिहिलेली एका सूफी कवीची कविता आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे. अमीर खुसरो यांच्या 'छाप तिलक सब छीनी रे' या कवितेवर आधारित गाण्याला लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केले. विशेष म्हणजे, या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही, तर पाकिस्तानमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळाली.

| Updated on: Nov 18, 2026 | 1:35 PM
1 / 5
अमीर खुसरो हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध सूफी कवी, गायक आणि संगीतकार होते. त्यांनी आपल्या गुरूंसाठी 'छाप तिलक सब छीनी रे' ही कविता लिहिली होती. याच कवितेवर पुढे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणे तयार झाले.

अमीर खुसरो हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध सूफी कवी, गायक आणि संगीतकार होते. त्यांनी आपल्या गुरूंसाठी 'छाप तिलक सब छीनी रे' ही कविता लिहिली होती. याच कवितेवर पुढे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणे तयार झाले.

2 / 5

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं तुलसी तेरे आंगन की' या चित्रपटात हे गाणे समाविष्ट करण्यात आले होते. या चित्रपटात नूतन, विनोद खन्ना आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील इतर गाण्यांसोबतच या गाण्यालाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

3 / 5

छाप तिलक सब छीनी रे तोसे नैना मिलाइके...' हे गाणे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली. बृजभाषेतील या गीताचे सौंदर्य आजही कायम आहे.

4 / 5

या गाण्याचे अनेक नवीन व्हर्जन तयार करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या कोक स्टुडिओच्या सातव्या सीझनमध्ये राहत फतेह अली खान यांनीही हे गाणे सादर केले होते. त्यामुळे या गाण्याची लोकप्रियता देशाच्या सीमाही ओलांडून गेली.

5 / 5

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गिन्नी वेड्स सनी 2' या चित्रपटातही या गाण्याचे नवीन व्हर्जन ऐकायला मिळाले. हीर आणि पॅराडॉक्स यांनी ते गायले आहे. मात्र, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील मूळ गाण्याची जादू आजही कायम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us