Vande Bharat : 24 कोचची वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, 160 किमी वेग, बर्थ- टॉयलेटपर्यंत मिळणार या सुविधा

17 कोचच्या वंदे भारत ट्रेनसोबतच लवकरच 24 कोचच्या ट्रेन धावणार आहेत . या 24 कोचच्या वंदे भारतमध्ये उत्कृष्ट सोयीसुविधा मिळणार आहेत. नवजात बाळांपासून दिव्यांग प्रवाशांपर्यंंत सर्व प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच नव्या ट्रेनचा वेगही अधिक असणार आहे.

| Updated on: Oct 13, 2026 | 3:09 PM
1 / 9
ट्रेनमध्ये  रात्रभर प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे आपल्या रेल्वेमध्ये मोठा बदल करणार आहे. 16 स्लीपरच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नंतर आता 24 कोचची ट्रेन बनवण्याची प्लॅन आखला जात आहे. ज्यामुळे नागरिकांना कॅटीन,टॉयलेट्समध्ये हायक्लास सुविधा मिळणार आहे.

ट्रेनमध्ये रात्रभर प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे आपल्या रेल्वेमध्ये मोठा बदल करणार आहे. 16 स्लीपरच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नंतर आता 24 कोचची ट्रेन बनवण्याची प्लॅन आखला जात आहे. ज्यामुळे नागरिकांना कॅटीन,टॉयलेट्समध्ये हायक्लास सुविधा मिळणार आहे.

2 / 9

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई स्टिल इंटीग्रल फॅक्टरी या कंपनीला 24 कोचची वंदे भारत बनवण्याचे कॉट्रक्ट देण्यात आले आहे. नव्या ट्रेनचे डिझाईन जून 2027 पर्यंत पुर्ण करण्याचे लक्ष आहे.

3 / 9

24 कोचच्या वंदे भारतमध्ये काय आहे खास? :नव्या वंदे भारतमध्ये प्रवाशांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. आधीच्या ट्रेनपेक्षा या ट्रेनमध्ये मोठ्या सुविधा मिळणार आहेत. सगळ्यात मोठा बदल पँट्रीमध्ये करण्यात आला आहे. जेवण गरम करण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत या ट्रेनमध्ये सुविधा मिळणार आहेत. यासोबतच या 24 कोचच्या वंदे भारतमध्ये शौचलयाच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली आहे. ICF चे इंजिनीअर्स ट्रेनच्या इंटीरिअरला मॉडर्न टच देणार आहेत.

4 / 9

200 पेक्षा जास्त वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्यावर लक्ष : भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 24 कोच असणार्‍या जवळपास 200 वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. चेन्नईच्या कंपनीकडे सध्या 50 वंदे भारत बनवण्याचे कॉन्ट्र्क्ट देण्यात आले आहे.

5 / 9

तर काइनेट रेल्वे सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 120 वंदे भारत बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. हा रशियन रोलिंग स्टॉक कंपनी TMH, रशियन उपकरण पुरवठादार LES आणि भारत सरकारचा उपक्रम असलेला रेल विकास निगम लिमिटेड RVNL यांचा संयुक्त उपक्रम आहे. तसेच टिटागड रेल सिस्टिम लिमिटेड आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत 80 वंदे भारत स्लीपर ट्रेन्सची निर्मिती केली जाणार आहे.

6 / 9

झोपायला आणि उठायला अधिक आरामदायक : 24 डब्ब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. रात्रीच्या वेळी वेगळी लाईटिंग, पॅसेंजर अनाउंसमेंट सिस्टम यासोबतच व्हिज्युअल इंफॉर्मेशन देणारी स्क्रिन आणि सीसीटिव्ही असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये वेगळ्या लाईट्स, मोबाईल चार्जिंग पोर्टल आणि छोटे कॉफी टेबल देखील मिळणार आहे.

7 / 9

मॉडर्न टॉयलेट्स आणि दिव्यांग प्रवाशांसाठी खास सुविधा : नव्या वंदे भारतमध्ये विमानातील शौचालयासारख्या आधुनिक बायो - व्हॅक्यूम टॉयलेट्स लावले जाणार आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी स्पेशल टॉयलेट आणि नवजात बाळासाठी एक वेगळा कोपरा देखील असणार आहे. तसेच एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये गरम पाण्याच्या शॉवरचा देखील पर्याय देण्यात येणार आहे.

8 / 9

वंदे भारतच्या सेफ्टीसाठीचेही मोठे प्लॅन:नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन्स स्वदेशी कवच टक्कर प्रतिबंधक प्रणालीने सुसज्ज असतील. ऊर्जा वाचवण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. डब्यांमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि बाहेरील धूळ व हवेचा प्रभाव कमी करण्यासाठी ,डब्यांमध्ये पुर्णपणे बंद कॉरिडॉर असणार आहेत.

9 / 9

या ट्रेनमध्ये सिक्यूरिटीसाठी एक सुविधा तैनात असणार आहे. आतत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना लोको पायलटशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येत डब्यात टॉकबॅक सुविधा देखील मिळणार आहे. ट्रेन जून 2027 पर्यंत नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us