90च्या दशकातील रोमँटिक गाणं, आजही ट्रक, बस आणि ऑटो रिक्षामध्ये ऐकू येतं, या गाण्याचे आजही प्रचंड चाहते
90 च्या दशकातील सर्वात सुपरहिट गाणं, जे आजही अनेक बस, ट्रक आणि ऑटो रिक्षांमध्ये ऐकायला मिळतं. अनेकजण तर हे गाणं ऐकताच थेट गुणगुणतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 90 चे दशक संगीताच्या दृष्टीने अतिशय खास मानले जाते. या काळात प्रदर्शित झालेली अनेक गाणी आजही बस, ट्रक आणि ऑटो रिक्षांमध्ये ऐकायला मिळतात.
कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजातील ‘तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया’ हे गाणे त्यापैकीच एक आहे. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंग’ चित्रपटातील हे गाणे जितेंद्र आणि अमृता सिंह यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
सुरेंद्र साथी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते. डोंगरांच्या सुंदर पार्श्वभूमीवर चित्रित झालेला दोघांचा रोमँटिक अंदाज आणि गायकांच्या आवाजातील गोडवा यामुळे हे गाणे विशेष लोकप्रिय झाले.
‘रंग’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट होता. यात जितेंद्र आणि अमृता सिंह यांच्यासह दिव्या भारती, कमल सदाना आणि आयशा जुल्का यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन तलत जानी यांनी केले होते.
त्या काळात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या गाण्यांची प्रचंड लोकप्रियता होती. ‘तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया’ या गाण्यानेही श्रोत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले.