बॉयफ्रेंड म्हणून तो खूप त्रासदायक…शाहरुख खानबद्दल स्पष्टच बोललेली गौरी, पहिल्यांदाच..
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. गौरी खान हिने शाहरूख खान याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आहेत. त्यांची लव्ह स्टोरीही खास आहे. नात्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये शाहरूख खान खूप जास्त पझेसिव्ह होता. त्याने काही नियमच गौरी खान हिला सांगितले होते.
याबाबत अभिनेत्यानेच मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. शाहरूख खान याने सांगितले की, मी खूप जास्त पझेसिव्ह आणि इनसिक्युर होतो. मी गौरीला केसही मोकळे सोडू देत नव्हतो. पांढरा शर्ट घालण्याची तिला परवानगी नव्हती.
मी तिला स्पष्ट सांगितले होते की, तू जर माझी गर्लफ्रेंड असशील तर तुला केस मोकळे सोडण्याची परवानगी नसेल. यावर गौरी खान हिने म्हटले की, जर मी हे ऐकले नसते तर त्याने मला सोडलेही असते.
शाहरूख खान हा 18 वर्षांचा तर गौरी खान ही 14 वर्षांची असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी यादरम्यानच्या काळात अनेक चढउतार देखील बघितले. शाहरूख खान हा त्यावेळी स्टारही नव्हता.
25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरूख खान आणि गौरी खान यांनी लग्न केले. तीन मुले त्यांना आहेत. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही पद्धतीने गौरी खान आणि शाहरूख खान यांनी लग्न केले.