तो खूपच अहंकारी आहे…; विराट कोहलीबद्दल डिव्हिलियर्सचा अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?
AB de Villiers on Kohli : क्रिकेटर्सची मैत्रीही अनेकदा चर्चेत असते. या यादीमध्ये किंग कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री सर्वात टॉपवर आहे, असं म्हणता येईल. या दोन्ही खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु म्हणजे आरसीबीसाठी अनेक सामने सोबत खेळले आहेत.

एबी डिव्हिलियर्सने एका पॉडकास्टमध्ये विराट कोहलीबद्दल बोलताना, सुरुवातीच्या काळात तो अतिआत्मविश्वासू आणि अहंकारी वाटत असल्याचा खुलासा केला आहे.
प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये विराटबद्दलच्या पहिल्या प्रतिक्रियेविषयी विचारले असता, डिव्हिलियर्सने सांगितले की, विराटही याबाबत सहमत असेल, असे म्हटले आहे.
विराट कोहली जेव्हा 19 ते 21 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. त्याच आत्मविश्वासाचा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले.
यश मिळवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे आवश्यक आहे. तरुणपणी विराटला स्वतःला सिद्ध करायचे होते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक ठळकपणे दिसत होता, असेही डिव्हिलियर्सने सांगितले.
वयानुसार विराटच्या स्वभावात बदल झाला. क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून तो अधिक परिपक्व झाला. त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड कमी झाली आणि त्याचा स्वभाव अधिक संतुलित झाल्याचे डिव्हिलियर्सने सांगितले. हे सर्व वक्तव्य आपण खेळीमेळीने करत असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं आहे.