या गायकाला बनायचे होते CA, पण एसडी बर्मन यांचा फोन आला आणि संपूर्ण आयुष्य बदललं

बॉलिवूडमधील गायक हे कायमच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा जगभरात आहे. पण एक प्रसिद्ध गायक असा आहे ज्याला कधीही गायक व्हायचे नव्हते. पण एक फोन आला आणि संपूर्ण आयुष्य बदललं.

| Updated on: Oct 29, 2026 | 11:25 AM
1 / 5
बॉलिवूडमधील अशी अनेक गाणी आहेत जी प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली आहेत. मात्र, ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतात. या गाण्यांसाठी गायकांपासून सगळ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण या सगळ्यांमध्ये एक गायक असा होता ज्याला या क्षेत्रात यायचे नव्हते. त्याला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे होते. पण एक दिवस असा काही फोन आला की सर्वकाही बदललं.

बॉलिवूडमधील अशी अनेक गाणी आहेत जी प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली आहेत. मात्र, ही गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतात. या गाण्यांसाठी गायकांपासून सगळ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण या सगळ्यांमध्ये एक गायक असा होता ज्याला या क्षेत्रात यायचे नव्हते. त्याला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे होते. पण एक दिवस असा काही फोन आला की सर्वकाही बदललं.

2 / 5

८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट गायकांनी पदार्पण केले होते. याच काळात प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचाही चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यांनी आपल्या मखमली आणि सुमधूर आवाजात अनेक अप्रतिम गाणी गायली. त्यांनी मोठ्या पडद्यावर अनेक सुपरस्टार्सला आवाज दिला. मात्र, आधी त्यांना गायक न बनता चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनायचे होते. पण एसडी बर्मन यांसारख्या दिग्गज संगीतकारांच्या एका फोनने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.

3 / 5

अभिजीत भट्टाचार्य यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका बंगाली कुटुंबात ३० ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. अभिजीत आता ६८ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी केवळ हिंदी भाषेतीलच नव्हे, तर आसामी, ओडिया, बंगाली, मराठी, नेपाळी, भोजपुरी आणि पंजाबी भाषेतील गाण्यांनाही आवाज दिला आहे. केवळ १२ वर्षांच्या लहान वयातच अभिजीत यांनी स्टेजवर परफॉर्मन्स करायला सुरुवात केली होती. ही १९७० च्या दशकातील गोष्ट आहे. मात्र १९८० च्या दशकात वयाच्या २० वर्षांनंतर ते नोकरीच्या शोधात होते आणि चार्टर्ड अकाउंटंट बनू इच्छित होते. सीएचा कोर्स करण्यासाठी त्यांनी कानपूरहून मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय झाला.

4 / 5

अभिजीत सीए बनू इच्छित होते, तरीही त्यांना संगीतात रस होता. अहवालानुसार एके दिवशी दिग्गज संगीतकार एसडी बर्मन यांनी त्यांना फोन केला. एसडी बर्मन यांनी अभिजीत यांना दिग्गज अभिनेता देव आनंद यांच्या मुलाच्या ‘आनंद और आनंद’ या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. यासाठी त्यांनी आशा भोसले, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांसारख्या संगीत जगतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबत गाणी गायिली.

5 / 5

अभिजीत भट्टाचार्य यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये एक हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना सर्वाधिक लोकप्रियता ‘तुम दिल की धड़कन में’, ‘तुम्हें जो मैंने देखा’, ‘दिल का जो हाल है’, ‘तेरी आंखें झुकी झुकी’, ‘चुनरी चुनरी’, ‘बादशाह ओ बादशाह’, ‘तुम अगर सामने’, ‘मैं तुझसे ऐसे मिलूं’, ‘जरा सा झूम लूं मैं’, ‘शहर की लड़की’, ‘सुनो ना सुनो ना’ यांसारख्या गाण्यांमुळे मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us