AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर शेतकऱ्यांच्या अंतिम संस्कारालाही कुणी जाऊ नये; संजय गायकवाडांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

...तर शेतकऱ्यांच्या अंतिम संस्कारालाही कुणी जाऊ नये; संजय गायकवाडांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 11:38 AM
Share

शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा दहा-बारा पुढाऱ्यांना मारावं, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांआधी केलं होतं. प्रकाश आंबेडकरांनंतर आता संजय गायकवाड यांचं शेतकरी आत्महत्या विषयावरील विधान चर्चेत आलं आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकर्‍याच्या अंत्य संस्कारालाही कोणी जाऊ नये, अशी विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. संजय गायकवाडांची जोरदार चर्चा होत आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावर उद्गिग्न प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकरी हा कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. खरंतर शेतकऱ्याला काही अडचण असल्यास आमदार, खासदाराला चिठ्ठी लिहावी. त्यावेळी आम्ही मदत करू, असे संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सांगितले. खरंतर शेतकरी कुठलाही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील कुणी जाऊ नये, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

मुश्रीफ अन् जरांगे काय म्हणाले?

संजय गायकवाड यांच्या विधानाने राजकारण पेटलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘संजय गायकवाड यांचे शेतकऱ्यांबाबतचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावी’. तसेच संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली. तर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. संजय गायकवाड खरं बोलणारे नेते आहेत. सत्ताधारी पक्षातले असले तरी त्यांना बोलायचं एक असेल, परंतु संदर्भ दुसरा असेल असंही असू शकतं’.

ठाकरे गटाचा आमदार काय म्हणाला?

ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले, ‘कुठलाही शेतकरी हौस म्हणून जीवन संपवत नाही. सरकार दरबारी कुठलीही दखल त्याची घेतली जात नाही. सर्व पर्याय संपतात…अस्मानी सुल्तानी दोन्ही बाजूंनी संकटं येतात आणि सरकार मदत करत नाही. तेव्हा हा शेवटचा पर्याय त्यांच्याकडे उरतो. जीवन संपवणं हे चुकीचंच आहे.  परंतु सत्ताधारी पक्षाकडून हे जे वक्तव्य आलं, यावरून पाशवी बहुमताने निवडून आलेल्या सरकारची शेतकऱ्यांविषयी असलेली संवेदनशीलता दाखवून देतं. हे सरकरचं मत कहीजण बोलून दाखवतात आणि काहीजण बोलून दाखवत नाहीत.  सरकारचं शेतकऱ्यांविषयी असलेलं मत आज सत्ताधाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं. असं सरकार महाराष्ट्रात आहे हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे’.

Follow Us
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय