AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोट्टे हो, कराळे मास्तरांनी आवळा देऊन कोहळा काढला, आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या पोटात गोळा आणणारी घोषणा

Nitesh Karale Big Decision: तर पोट्टे हो, आपल्या मास्तरांनी नागपूर पदवीधर निवडणूकीत लई जांगडगुत्ता केला ना भौ. भाजपच्या हातची सीट हा हा म्हणता म्हणता हिसकाली ना गडे हो. तर आता मास्तरानं अजून लई मोठा निर्णय घेतला हाव. त्यानं तं सत्ताधाऱ्यांनीशी विरोधक पण चक्रावणार हाव.

पोट्टे हो, कराळे मास्तरांनी आवळा देऊन कोहळा काढला, आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या पोटात गोळा आणणारी घोषणा
कराळे मास्तरांची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या पोटात गोळा आणणारी घोषणा
| Updated on: Oct 29, 2026 | 12:12 PM
Share

Nitesh Karale Big Decision: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात खरा तांडव घातला तो नितेश कराळे मास्तरांनी बरं का! कराळे गुरूंजींनी अख्ख्या मतदारसंघाचं वारंच फिरवलं आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी दारुगोळा, रसद पुरवली. मग काय, झाला ना भौ भाजपचा दणकावून पराभव. मास्तरनं लई भयानक डाव टाकली बी अन् पराभव होऊनही किंगमेकरही ठरले. आता मास्तर अजून एक गुलिगत बुक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तशीच डेंजर घोषणाच केली आहे.

25,000 लीडने भाजपची दाणादाण

नितेश कराळे यांनी पदवीधर मतदारसंघात 25 हजार मतं मिळवली. एका नवख्या उमेदवारांनं, पक्षीय बळ पाठीशी नसताना मोठी झेप घेतली. त्यांच्याच दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या आधारे नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारींचा विजय सुकर झाला. या मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळवण्यात कराळे मास्तरांचा मोठा हात मानल्या जातो. त्यांनी पूर्व विदर्भात पदवीधरांमध्ये चांगली क्रेझ निर्माण केल्याचे दिसते.

विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या

बॅलेट पेपरवरची मागणी होत आहे, महाराष्ट्राचे इतिहासात बॅलेट पेपरवर मतदान झालं तर इथे विजय कोण होत आहे ते पाहणं गरजचे आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला विनंती आहे की लक्ष द्या बॅलेट पेपर वर कोण निवडून आलं येत आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, अशी मागणी कराळे यांनी केली.

कराळे मास्तर नवीन पक्ष स्थापन करणार

अजूनही प्रमाणपत्र भेटायचं आहे उद्या सकाळी चार वाजेपर्यंत इलेक्शन चालणं, हे इलेक्शन नवीन अध्याय घेऊन आलं भविष्यात काम करणाऱ्या व्यक्तीला द्या अन्यथा जनता मतदानातून, पक्षाला तुमची जागा दाखवून देईल. भविष्यात एखादा पक्ष स्थापन करायचा का याबाबत मुलांनी चर्चा केली, लवकरच मीटिंग घेऊ, असे मोठे संकेत कराळे मास्तरांनी दिले. भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती उभा करून कोणत्याही राजकीय पक्षाच्या नाकात दम आणू शकतो. कराळे मास्तर कोण आहे याची आतापर्यंत दखल घेतली नाही मात्र आता कराळे मास्तरची दखल घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

Follow Us
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय