IND vs NZ : अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमधील नवीन पावरहाऊस, हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

IND vs NZ 1st T20i :भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्माची बॅट चालली तर समोरच्या टीमची गोलंदाजी उद्धवस्त होते. पहिल्या टी20 मध्ये 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने दमदार सुरुवात केली.

| Updated on: Oct 22, 2026 | 4:37 PM
1 / 5
क्राइस्टचर्चच्या पहिल्या टी20 सामन्यात 12 चेंडूंचा सामना करताना अभिषेकने 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार होते. मायकल ब्रेसवेलने सहाव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला पॅवेलियनचा रस्ता दाखवला.

क्राइस्टचर्चच्या पहिल्या टी20 सामन्यात 12 चेंडूंचा सामना करताना अभिषेकने 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकार होते. मायकल ब्रेसवेलने सहाव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला पॅवेलियनचा रस्ता दाखवला.

2 / 5

संजू सॅमसनने 33 चेंडूत 67 धावा फटकावल्या. त्यांनी 93 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. अभिषेक शर्मा मोठी इनिंग खेळला नाही. पण त्याने रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या पावरप्लेच्या ओव्हर्समधील अभिषेक शर्मा सिक्सर किंग बनला आहे.

3 / 5

26 वर्षीय अभिषेक शर्मा आतापर्यंत 68 सामने खेळला आहे. त्याने 146 षटकार ठोकलेत. यात पावरप्लेमध्ये त्याने 99 सिक्स मारलेत. टी20 क्रिकेटच्या इतिहासात पावरप्लेमध्ये कुठल्याही फलंदाजाने मारलेल्या या सर्वाधिक सिक्स आहेत.

4 / 5

हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आपल्या करिअरमध्ये पावरप्लेमध्ये 98 सिक्स मारल्या होत्या. त्याने भारतासाठी 159 सामन्यात 205 सिक्स मारले. रोहित आता टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्त झालाय.

5 / 5

आता भारतासाठी फक्त तो वनडे सामने खेळतो. टी29 क्रिकेटच्या पावरप्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या प्लेयर्सच्या यादीत मार्टिन गुप्टिल तिसऱ्या नंबरवर आहे. न्यूझीलंडचा माजी फलंदाज गुप्टिलने 122 टी20 सामन्यात एकूण 97 सिक्स मारले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us