
दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचा केवळ दक्षिणेतच चाहतावर्ग नाही तर संपूर्ण भारतात आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

महेश बाबूची भूमिका असलेला ‘मेजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच लाँचला झाला. यावेळी कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्याने बॉलिवूडमधील त्याच्या पदार्पणाच्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं आहे . “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडू शकणार नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी माझा वेळ का वाया घालवू”, असं तो म्हणाला.

मला इथे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये प्रचंड स्टारडम आणि आदर मिळतोय. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याचा मी विचारच करू शकत नाही. चित्रपटांमध्ये काम करून मोठा कलाकार बनायचं माझं स्वप्न होतं. हेच स्वप्न मी आता जगतोय आणि याहून अधिक खूश मी होऊ शकत नाही”, अशा शब्दांत महेश बाबू व्यक्त झाला.

मात्र या वक्तव्यानंतर महेश बाबूने स्पष्टीकरण दिले की मला सिनेमा आवडतो आणि सर्व भाषांचा आदर करतो, असे महेशने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की तो ज्या चित्रपटात काम करतोय तो चित्रपट करण्यास मी कम्फर्टेबल आहे. तेलुगू सिनेमाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत असलेला पाहणे माझ्यासाठी मोठ्या आनंदाची बाब आहे.