
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेनंतर विल स्मिथवर पुढील 10 वर्षांसाठी ऑस्करमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकला स्टेजवरच थोबाडीत मारली होती. याची गंभीर दखल ऑस्कर अकादमीकडून घेण्यात आली आहे. स्मिथला पुढील10 वर्षांसाठी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे आयोजित इतर कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

"विल स्मिथच्या कारवाई नंतर ऑस्कर अकादमीने पत्र जाहीर करत. विल स्मिथच्या कृतीवरील आज करण्यात आलेली कारवाई ही आमच्या कलाकार, पाहुणे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उचलले पाऊल असून, अकादमीविषयी एक विश्वासाहर्ता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून उचलले पाऊल आहे, असे म्हटले आहे.

या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर कॅम्पेनिंगकरत स्मिथकडून त्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर काढून घेण्याची मागणी केली होती. जो त्याने टेनिस बायोपिक "किंग रिचर्ड" मधील त्याच्या अभिनयासाठी जिंकला होता.

ऑस्कर सोहळ्यादरम्यान, स्मिथ अचानक स्टेजवर चढला आणि पत्नीच्या डोक्यावरून सूत्रसंचालक रॉकने मारलेल्या विनोदाबद्दल त्याच्या थोबाडीत मारली. स्मिथची पत्नी अभिनेत्री जाडा पिंकेट स्मिथ हिला अलोपेसिया नावाचा आजार असून, यामध्ये रुग्णाचे केस गळतात व रुग्णाला टक्कल पडते.

या घटनेनंतर अकादमीने स्मिथला लगेचच ऑस्कर बॉलरूममधून बाहेर पडण्यास सांगितले होते, परंतु त्याने तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर आपल्या कृतीविषयी जाहीर माफीही मागितली होती. आपल्या पत्नीच्या आजारपानावरुन झालेली चेष्टा सहन न झाल्याने माझ्या हातून हे कृत्य घडल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले होते.