हा घटस्फोट आहे की ड्रामा? प्रसिद्ध अभिनेत्रीवर लोक खवळले, डिवोर्सनंतर पूर्व पतीसोबत आता थायलंड टूरवर

एका यूजरने कमेंट करताना लिहिलय की, हा घटस्फोट आहे की ड्रामा..जेव्हा मनाला वाटलं तेव्हा एकत्र आले...जेव्हा वाटलं तेव्हा घटस्फोट घेतला. चला डिवोर्स-डिवोर्स खेळू. एका युजरने लिहिलय की, आता काही दिवसांपूर्वी परस्परांवर टीका करत होते. एका युजरने लिहिलय की, डिवोर्स पब्लिसिटी स्टंट होता.

| Updated on: Sep 09, 2025 | 4:20 PM
1 / 5
सर्वसामान्य असो किंवा स्टार. अनेकदा मुलांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. घटस्फोटानंतरही पूर्व जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवावे लागतात. टीव्हीवरच्या एका अभिनेत्रीने नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला, त्यावेळी खूप गोंधळ घातलेला. व्लॉग बनवून पूर्व पती विरोधात खूप वक्तव्य केलेली. दोघांच्या घटस्फोटाचा तमाशा सगळ्या जगाने बघितलेला.

2 / 5
आम्ही बोलतोय टीव्ही अभिनेत्री  चारु असोपाच्या घटस्फोटाबद्दल. घटस्फोटानंतर ती मुलीला घेऊन मुंबई सोडून जयपूरला शिफ्ट झाली. मागच्या काही दिवसांपासून चारु आणि तिचा पूर्व पती राजीव सेन खूप चर्चेत आहे. दोघे एकत्र दिसतायत. मस्ती करतायत आणि आता सोबत ट्रिपला रवाना झालेत.

3 / 5
अलीकडेच राजीव सेनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. त्यात तो आपली मुलगी आणि एक्स वाईफ चारु सोबत दिसतोय. राजीवने कॅप्शनमध्ये लिहिलय की, तो मुलीसोबत तिसऱ्या इंटरनॅशनल ट्रिपसाठी थायलंडला जातोय. तिघेही फोटोत खूप आनंदी दिसतायत.

4 / 5
काही दिवसांपूर्वी चारु आणि मुलीला भेटण्यासाठी राजीव आईसोबत जयपूरला आला होता. तिथे चारुने आपल्या पूर्व पतीच ढोल-ताशा वाजवून स्वागत केलं. इतकच नाही, तिने आपली पूर्व सासूचे आशीर्वाद घेतले. त्यांना ओवाळलं सुद्धा.

5 / 5
विषय इथेच संपत नाही. चारु आपला पूर्व पती आणि पूर्व सासूसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. दोघांनी सोबत अनेक फोटो काढले. फोटोजमध्ये चारु आणि राजीव परस्परांच्या खूप जवळ वाटले. दोघांना पाहून असं अजिबात वाटलं नाही की, त्यांचा घटस्फोट झालाय.