Madhuri Dixit Net worth : रिअल इस्टेटमध्येही ‘धकधक गर्ल’ सुपरहिट, एका प्रॉपर्टी डीलने कमावला तब्बल 824% नफा; माधुरीचं नेटवर्थ किती ?

अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईतील ऑफीस विकलं असून, त्यातून तिला बक्कळ नफा झाला. गेल्या 4-5 वर्षांत तिनेअनेक फायदेशीर व्यवहार केले आहेत. बॉलिवूडच्या धकधक गर्लची एकूण संपत्ती किती आहे, माहीत आहे ?

| Updated on: Aug 05, 2026 | 2:45 PM
1 / 6
आजकाल बॉलिवूड कलाकारांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणी आपली मालमत्ता विकतंय, तर कोणी नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना दिसतं. आता या यादीत अभिनेत्री माधुरी दीक्षितचंही नाव समोर आलं आहे. तिने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आपली एक व्यावसायिक मालमत्ता (ऑफिस स्पेस) 4.85 कोटी रुपयांना विकली आहे. विशेष म्हणजे, हीच प्रॉपर्टी तिने तब्बल 18 वर्षांपूर्वी अवघ्या 52.5 लाख रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारातून तिला  सुमारे 824 टक्के नफा मिळाला आहे. ( All Photos : Social Media)

2 / 6
ही ऑफिस स्पेस मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील लिंक रोडजवळील ओशिवारा परिसरातील 'मोरया लँडमार्क-II' इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. 1,594.24 चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या या मालमत्तेसोबत तीन कार पार्किंगची सुविधाही आहे. रिपोर्ट्सनुसार, फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने ही मालमत्ता खरेदी केली आहे. या व्यवहाराची नोंदणी 23 जून रोजी झाली असून, यासाठी 29.10 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली.

3 / 6
माधुरी दीक्षित हिने डिसेंबर 2025 मध्ये जुहूमधील आपला फ्लॅट 3.9 कोटी रुपयांना विकला होता. याआधी 2022 मध्ये तिने लोअर परळ येथे 48 कोटी रुपयांचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केला होता. त्याचबरोबर तिने पार्किंग स्पेसचाही स्वतंत्र व्यवहार केला आहे.

4 / 6
माधुरी दीक्षित सध्या मुंबईतील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. याशिवाय लोखंडवाला, जुहू आणि मालाड येथे तिच्या मालकीची प्रॉपर्टी आहे. अमेरिकेतील डेन्व्हर येथेही तिचा एक आलिशान बंगला आहे.

5 / 6
माधुरी दीक्षित हिची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं.  एका चित्रपटासाठी ती 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेते. तसंच रिअॅलिटी शो, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि ऑनलाइन डान्स स्कूलमधूनही तिची मोठी कमाई होते.

6 / 6
माधुरी दीक्षितशिवाय ऋतिक रोशन, कार्तिक आर्यन आणि सैफ अली खान यांसारख्या कलाकारांनीही व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असून, ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक करण्याकडे बॉलिवूड कलाकारांचा वाढता कल दिसून येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us