‘तुझी फिगर मस्त आहे, खूप पैसै कमवशील’ तारक मेहतामधील या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

'तारक मेहता'मधील प्रसिद्ध आणि सर्वात बोल्ड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव. नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 02, 2026 | 10:29 AM
1 / 5
मनोरंजन क्षेत्रातील चकाकीमागील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता...’ मधील अभिनेत्री नेहल वडोलियाने नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील चकाकीमागील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता...’ मधील अभिनेत्री नेहल वडोलियाने नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

2 / 5

‘सुनो इंडिया’ पॉडकास्टमध्ये बोलताना नेहलने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणाऱ्या कलाकारांना अनेकदा खोट्या आश्वासनांनी फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तिने दावा केला की 2018 मध्ये एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने काम देण्याच्या बहाण्याने तिला भेटण्यासाठी बोलावले होते.

3 / 5

नेहलच्या म्हणण्यानुसार, संबंधित दिग्दर्शकाने तिला कामाबाबत चर्चा करण्यासाठी कारमध्ये भेटण्यास सांगितले. भेटीदरम्यान त्याने तुझी फिगर खूप मस्त आहे. तू मोठी कमाई करशील म्हणत कामाच्या संधींचे आमिष दाखवत तडजोड करण्याचे संकेत दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला.

4 / 5

अभिनेत्रीने सांगितले की, त्या संपूर्ण प्रसंगामुळे ती अत्यंत अस्वस्थ झाली होती. तिने तत्काळ त्या प्रस्तावाला नकार दिला आणि तेथून निघून गेली. मला अशा प्रकारचे कोणतेही काम करायचे नाही. मला फक्त टीव्ही क्षेत्रात काम करायचे होते असे तिने सांगितले.

5 / 5

नेहल वडोलियाने पुढे सांगितले की, अशा घटना कोणत्याही मुलीसाठी मानसिक धक्का देणाऱ्या ठरू शकतात. इंडस्ट्रीतील काही लोक नवोदित कलाकारांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात यावर विश्वास बसणे कठीण असल्याचेही तिने म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us