आलिया भट्टची आई सोनी राझदान यांना ‘या’ चित्रपटाचे पेमेंट तब्बल 10 वर्षांनी मिळाले
अभिनेत्री सोनी राझदान या दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या पत्नी असून त्यांची कन्या आलिया भट्ट सध्या आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनेत्री सोनी राझदान यांचा एक चित्रपट आणि तीन वेबसिरीज यावर्षी रिलीज झाल्याने साल २०२६ त्यांना चांगले गेले. हिंदी सिनेमातील योगदानाबद्दल या ज्येष्ठ अभिनेत्रीला आज आदराचे स्थान मिळत आहे. पण त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना मानधनासाठी संघर्ष करावा लागला होता.

परंतू ८० च्या दशकात अभिनेत्री सोनी राझदान यांनाही संघर्ष करावा लागला आहे. एकेकाळी त्यांना केवल नकारच मिळत नव्हता तर त्यांच्या कामाचे पैसेही मिळत नव्हते असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना सोनी राझदान यांनी हा किस्सा सांगितला आहे. साल १९८६ मध्ये विधू विनोद चोप्रा यांच्या खामोश चित्रपटात सोनी राझदान यांनी शबाना आझमी, नसीरउद्दीन शाह आणि पंकज कपूर यांच्या सोबत काम केले.
ज्यावेळी आपण खामोश चित्रपटात काम केले तेव्हा मला पैसे मिळणार नाही असे माहिती होते. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना हा चित्रपट चालल्यानंतर पैसे येतीस त्यावेळी मानधन मिळेल असे आश्वासन दिले होते.
'खामोश' हा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा अवघा दुसरा सिनेमा होता.सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला कमर्शियल सक्सेस मिळाले नव्हते. ९० च्या दशकात टेलिव्हिजन आल्यानंतर त्यांनी टीव्हीचे हक्क विकले हा तेव्हा कल्ट मुव्ही ठरला.
त्यानंतर दहा वर्षांनी माझ्या घरी चेक आला. मी हा चेक का स्वीकारु असे विधू विनोद चोप्रा यांना मी विचारले. त्यावेळी मी तुला वचन दिले होते की या सिनेमाचे पैसे आल्यानंतर तुम्हाला मानधन मिळेल असे विधू विनोद चोप्रा यांना आपल्याला सांगितल्याची आठवण अभिनेत्री सोनी राझदान यांनी सांगितली.