
भारत या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्याच बाजूने कमी पडलेला दिसला नाही. प्रत्येक खेळाडूा दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. गोलंदाजीमध्ये तर त्रिकुटाने चांगल्या चांगल्या संघांना गार केलंय.

भारताला रोखण्यासाठी अॅडम गिलख्रिस्टला वाटतं की, विरोधी संघाने भारताविरूद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ कमकुवत वाटतो. पण भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शमी, बुमराह आणि सिराज रात्रीच्या वेळी क्लास गोलंदाजी करतात तेच जर दुपारच्यावेळी त्यांच्याविरूद्ध धावा करणं सोपं जाईल.

आकडेवारीवर नजर मारली तर वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पहिले पाच सामने चेस करताना जिंकले. तर तीन सामने पहिल्यांदा बॅटींग करत जिंकले आहेत.

भारतीय संघासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्मा घातक सुरूवात करून प्रेशर समोरच्या संघावर टाकतो. त्यामुळे बाकी खेळाडू दबाव न घेता चांगली फलंदाजी करतात.

दरम्यान, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंड संघाने पराभव केला होता. आता भारताला बदला घेण्याची चांगली संधी आहे.