Ajinkya Deo : मराहाष्ट्राची वाट आपल्याच लोकांनी लावलीये, मराठी माणसाच्या रक्तातच…, अजिंक्य देव स्पष्टच म्हणाले

Ajinkya Deo : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव सध्या 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली असून... त्यांची भूमिका देखील चाहत्यांना आवडली आहे. दरम्यान एक मुलाखतीत अजिंक्य देव यांनी मराठी माणसाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 2:47 PM
1 / 5
 नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेते अजिंक्य देव यांनी मराठी माणूस आणि परक्या राज्यातून आलेल्या माणसाबद्दल मोठं वक्तव्य केलं. एवढंच नाही तर, त्यांनी मराठी माणसाच्या मानसिकतेबद्दल देखील स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेते अजिंक्य देव यांनी मराठी माणूस आणि परक्या राज्यातून आलेल्या माणसाबद्दल मोठं वक्तव्य केलं. एवढंच नाही तर, त्यांनी मराठी माणसाच्या मानसिकतेबद्दल देखील स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

2 / 5

मुलाखतीत अजिंक्य देव म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास साक्षीदार आहे की, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांना खाली खेचून संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे. यामध्ये नवीन असं काहीच नाही.. हे तर मराठी रक्तात आहे..

3 / 5

हेच मराठी माणसाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. त्याच्या उलट जे परके आले, ते आपल्या लोकांना घेऊन आले. आपण आपल्याच राज्यात राहून आपल्याच... पुढे अजिंक्य देव यांनी पुढे बोलणं टाळलं... असं देखील अजिंक्य देव म्हणाले.

4 / 5

पुढे अजिंक्य देव म्हणाले, 'हे सत्य आहे, मराठी माणसाच्या रक्तात आहे. यामध्ये आपल्याचा करता येणार नाही. हे बदलेलं तेव्हात सगळं बदलेल. आपल्याला आपला माणून वर जातोय हे बघवत नाही.

5 / 5

पुढे मराठी माणसाच्या मानसिकतेचं उदाहरण देत अजिंक्य देव म्हणाले, 'अरे हा तर माझ्या बाजूला बसायचा हा तर माझ्या खाली हवा होता... याला हा रोल मिळाला! चला आता याच्या नकारात्मक करा..', सध्या सर्वत्र अजिंक्य देव यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us