Arjun Tendulkar: तब्ब्ल 13 मॅच बेंचवर बसवून ठेवलं! आता LSG ने IPL 2027 साठी अर्जुनला रिटेन केले की नाही?
Arjun Tendulkar LSG: लखनौ सुपर जायट्ंसने काल १० खेळाडूंना रिलीज केले. यात अर्जुल तेंडुलकरलचे नाव सामील आहे की नाही ते पाहा...

लखनो सुपर जायट्ंस संघासाठी मागील आयपीएल हंगाम अत्यतं खराब गेला. हंगाम संपताच संघाने पुढील हंगामासाठी योग्य पाऊले उचलायला सुरुवात केली. काल झालेल्या रिटेशन यादीत लखनौने तब्बल १० खेळाडूंची हकालपट्टी केली.
लखनौने मागील हंगामाचा कॅप्टन पंत याला देखील ट्रेड करत बाहेरचा रस्ता दाखवलेला. अशातच आता लखनौ एक चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. लखनौने मोहम्मद शमी, आवेश खान, एन्रिज नोर्जिया, आर्शिन कुलकर्णी तसेच वनिंदू हसरंगा यांना रिलीज केले.
चाहत्यांना भीती होती की लखनौ अर्जुन तेंडुलकरलाही रिलीज करणार की काय? कारण मागील हंगामात त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळालेली. मागील हंगामात लखनौने मुंबईसोबत ट्रेड करुन अर्जुलना आपल्या संघात सामील केले होते.
लखनौने शार्दुल ठाकुरला मुंबईकडे पाठवले आणि अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात सामील करुन घेतले होते. ३० लाखात तो मागील हंगाम खेळला होता. आता या वर्षीही अर्जुन लखनौकडून खेळताना दिसेल.
लखनौने त्याला रिलीज न करता रिटेन केल्याने चाहत्यांनाही आनंद झाला आहे. अर्जुन करत असललेल्या मेहनतीचे कौतुक वेळोवेळी चाहते करत असतात.