Rajinikanth On CM Vijay : थलपती विजयच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्न होताच रजनीकांत यांनी पटकन.. ही कृती बनली चर्चेचा विषय

Rajinikanth On CM Vijay : थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळली आहे. सीएम बनल्यानंतर विजय यांनी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. विजय यांच्या TVK पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यांनी 108 जागा जिंकल्या. राज्यातील ते सर्वात मोठा पक्ष ठरले आहेत.

| Updated on: May 13, 2026 | 8:09 AM
1 / 5
या विजयानंतर थलपती विजय यांना दक्षिणेतील अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत. कमल हसन यांनी सुद्धा विजयला शुभेच्छा दिल्या. रजनीकांत यांनी सुद्धा निवडणूक निकालानंतर एक्सवर पोस्ट करुन विजयला शुभेच्छा दिल्या होत्या. पण आता एक व्हिडिओ समोर आलाय.

2 / 5
निकाल लागल्यानंतर तीन-चार दिवस सत्ता स्थापेनचा पेच निर्माण झालेला. अखेर रविवारी विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये शपथविधी झाला.

3 / 5
हजारो फॅन्स या शपथविधी सोहळ्याला हजर होते. राज्यपाल  राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजयला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. काँग्रेसच्या पाच आमदारांनी TVK ला पाठिंबा दिला आहे.

4 / 5
मंगळवारी रजनीकांत चेन्नई विमानतळावर दिसले. यावेळी त्यांना तिथे उपस्थित पत्रकारांनी थलपती विजयने मुख्यमंत्रीपद संभाळलं त्यावर प्रश्न विचारला. त्यावर रजनीकांत काही बोलले नाहीत. ते फक्त हसले. हात जोडले आणि आत निघून गेले.

5 / 5
4 मे रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केलेली. "TVK प्रेसिडेंट थिरु विजय आणि त्याच्या पक्षाच्या तमाम सदस्यांना तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील दमदार विजयाबद्दल शुभेच्छा"

Follow Us