
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघाचा खेळाडू इब्राहिम झद्रान याने 129 धावांची शतकी खेळी करत शेवटपर्यंत नाबाद राहिला.

अफगाणिस्तानकडून इब्राहीमने 143 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 129 धावांची शतकी आणि ऐतिहासिक खेळी केली. अफगाणिस्तानसाठी शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

अफगाणिस्तान संघाचा खेळाडू शमीउल्लाह शेनवारी याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँडविरूद्ध 96 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी इब्राहिम जादरान यानेच पाकिस्तानविरूद्ध 87 धावांची खेळी याच वर्ल्ड कपमध्ये केली होती.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये साली इकराम अलिखिस याने वेस्ट इंडिजविरूद्ध 84 धावांची खेळी केली होती.