Green Chili Pickle : घरीच हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्याची झटपट रेसिपी; बघताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

तिखट आणि आंबट चवीचं हिरव्या मिरचीचं लोणचं जेवणाची रंगत वाढवतं. कमी वेळेत घरच्या घरी लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

| Updated on: Oct 13, 2026 | 9:52 PM
1 / 8
हिरव्या मिरचीचं लोणचं म्हणजे साध्या जेवणाची चव वाढवणारा झणझणीत पदार्थ! गरमागरम भाकरी,वरण -भात किंवा वाफाळत्या पोळीसोबत हे लोणचं खायला मिळालं की जेवणाची मजाच वेगळी, चला झ़़टपट खमंग  चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं बनवूया

हिरव्या मिरचीचं लोणचं म्हणजे साध्या जेवणाची चव वाढवणारा झणझणीत पदार्थ! गरमागरम भाकरी,वरण -भात किंवा वाफाळत्या पोळीसोबत हे लोणचं खायला मिळालं की जेवणाची मजाच वेगळी, चला झ़़टपट खमंग चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं बनवूया

2 / 8

साहित्य : हिरव्या मिरच्या 250 ग्रॅम, मोहरीची डाळ- 2 चमचे, मेथीदाणे - 1 चमचा, बडीशेप - 1 चमचा, हळद - अर्धा चमचा, हिंग - चिमूटभर, मीठ, लिंबाचा रस - 3-4 चमचे, तेल - अर्धी वाटी, मोहरी- अर्धा चमचा

3 / 8

हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या : हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे कोरडे होऊ द्या. मिरच्या ओल्या राहिल्यास लोणचे लवकर खराब होऊ शकते. त्यानंतर मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा.

4 / 8

मसाला तयार करा : कढईत मेथीदाणे आणि बडिशेप मंद आचेवर हलके भाजून घ्या. ते थंड झाल्यावर जाडसर कुटून घ्या. त्यात मोहरीची डाळ, हळद , हिंग आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा

5 / 8

मिरच्यांना मसाला लावा : कापलेल्या मिरच्यांमध्ये तयार मसाला आणि लिंबाचा रस घाला.सर्व तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल असे एकत्र करा. लिंबाच्या रसामुळे लोणच्याला आंबटपणा आणि छान चव येते.

6 / 8

तेलाची फोडणी द्या :एका छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्या. तेल कोमट झाल्यावर मिरच्यांवर ओता आणि व्यवस्थित मिसळा.

7 / 8

लोणचं मुरू द्या : लोणचे पुर्ण थंड झाल्यावर स्वच्छ,पूर्ण कोरड्या काचेच्या बरणीत भरा. काही तास मुरू दिल्यानंतर त्याची चव खूलू लागते.

8 / 8

लोणचं चविष्ट होण्यासाठी खास टिप्स : कमी तिखट लोणचं हव असल्यास कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या निवडा. मिरच्या धुतल्यानंतर त्यावर ओलावा राहू द्या मोहरी आणि मेथी जास्त भाजू नका, नाहीतर लोणचे कडवट होईल, लोणच्यासाठी स्वच्छ कोरडी भरणी निवडा. कोरडा चमचा वापरा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us