
टार्जन चित्रपटातून आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण आता ती ग्लॅमर वर्ल्ड पासून लांब गेली आहे. पण सोशल मीडियावर अजूनही ती Active आहे. 22 ऑगस्टला तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. त्यात ती सिल्कच्या साडीत ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली.

साडीसोबत आयशाने हेवी गोल्ड नेकलेस सुद्घा घातलं होतं. तिला पहिल्या नजरेत पाहिल्यानंतर ओळखता आलं नाही. त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

सर्जरी करुन चेहऱ्याची वाट लावली असं युजर्सनी कमेंटमध्ये म्हटलं. काही लोकांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली. आयाशाने फोटो पोस्ट करुन 24 तास झाले नव्हते, ते तिने तिच इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं.

आयशाने रागात तिच इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलय की अजून काही कारण आहे, हे तिच सांगू शकते. तिच्या कृतीवरुन असच वाटतं की सध्या सर्जरीमुळे बिघडलेला चेहरा लपवतेय.

आयशाने ट्रोलिंगवर राग काढण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा पोस्ट करुन ती ट्रोलिंगबद्दल बोललीय. डेब्यु चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या आयशाने जवळपास 21 हिंदी चित्रपटात काम केलय. वयाच्या 23 व्या वर्षी बिजनेसमन फरहान आजमी सोबत तिने लग्न केलं. लग्नानंतर ती एका मुलाची आई आहे.