
बाबा वेंगा ही एक प्रसिद्ध भविष्यवेत्ती होती. तिचा जन्म 1911 मध्ये बुल्गारियामध्ये झाला होता. तिने अनेक भविष्यावाण्या केल्या आहेत. तिचे समर्थक या भविष्यावाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करतात.

सोव्हिएत युनियनचं विघटन, 9/11 चा हल्ला, आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू, जपानमधील त्सुनामी हे भाकीत खरी ठरल्याचा दावा तिचे समर्थक करतात. अर्थात या दाव्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

1. जगभरात आर्थिक संकट: 2025 मध्ये जगाला एक मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल असे भाकीत बाबा वेंगाने केले आहे. जागतिक बाजारपेठा पत्त्यासारख्या कोसळतील. अनेक देश आर्थिक संकटात सापडतील अशी तिची भविष्यावाणी आहे.

2. नैसर्गिक आपत्ती: 2025 मध्ये अनेक ठिकाणी भूकंप, महापूर, ज्वालामुखीच्या उद्रेक या सारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता तिने वर्तवली आहे.

3. दोन महिन्यांत जगासाठी मोठा धोका : जुलै 2025 मध्ये एक भयंकर संकट जगावर येणार असल्याचा दावा तिने केला आहे. तिचं हे भाकीत नैसर्गिक, राजकीय, दहशतवाद, अस्थिरता यापैकी कशाशी आहे हे काही समोर आलेले नाही. पण तिने दोन महिन्यानंतर संकट येणार असल्याचा दावा केला आहे.

4. डिस्क्लेमर : बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही. वैज्ञानिक संस्था, हवामान खातं, आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या सूचनाचं आणि माहितीचं पालन करा. टीव्ही 9 मराठी या दाव्याबाबत कुठलाही दावा करत नाही अथवा त्याला दुजोरा देत नाही.

बाबा वेंगाचे ते भाकीत