
बाबा वेंगा हे असे नाव आहे, ज्यांनी पुढच्या अनेक वर्षांची भविष्यवणी अगोदरच करून ठेवलेली आहे. बाबा वेंगा यांनी केलेले अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ऑगस्ट महिन्यात घडून येणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटनांचं भविष्य व्यक्त केलं आहे. आता या दोन भविष्यवाण्या नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊ या...

बाबा वेंगा यांनी ऑगस्ट महिन्यासाठी एकूण दोन भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांच्या या भविष्यवाण्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या भविष्यावण्या समोर येताच लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत.

बाबा वेंगा यांनी ऑगस्ट महिन्याच्या आपल्या पहिल्या भविष्यवाणीत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये डबल फायर समोर येणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच आकाश आणि जमिनीतून दुहेरी आग निघेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता या डबल फायरचे स्वरुप नेमके कसे असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही लोक ही आग जंगलात लागू शकते, असा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही लोक हे लवकरच ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे, असे म्हणत आहेत. काही लोक लवकरच पृथ्वीवर अन्य ग्रह धडकणार आहे, असा अंदाज लावत आहेत.

बाबा वेंगा यांनी याच ऑगस्ट महिन्यात आणखी एक महत्त्वाची घटना घडणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी बुद्धी आणि ज्ञान यांचा मोठा संगम होईल असं म्हटलंय. यामुळे अंचबित करणाऱ्या घटना घडतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच एक गोष्ट एकदा उघडणार आणि ती कधीच बंद होणार नाही, असंही भविष्य त्यांनी वर्तवलंय. त्यामुळे कधीही बंद न होणारी बाब एआय असू शकते, असे अंदाज लावले जात आहेत. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीचा नेमका अर्थ काय असेल? याचाच विचार सामान्य लोक करत आहेत.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.