AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबूधाबी मधील बीएपीएस हिंदू मंदिरात ‘अ सिम्फनी ऑफ हार्मनी’ या पुरस्काराने दिव्यांगांचा सन्मान

बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबीने 'अ सिम्फनी ऑफ हार्मनी' कार्यक्रम आयोजित केला, ज्यात दिव्यांग व्यक्ती, समावेश आणि मानवी मूल्यांचा उत्सव साजरा करण्यात आला. 15 वर्षीय पियानोवादक अहमद अल हाशिमीचे मनमोहक सादरीकरण हे मुख्य आकर्षण ठरले.

| Updated on: Nov 19, 2025 | 11:47 AM
Share
बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबीने 'अ सिम्फनी ऑफ हार्मनी' नावाच्या एका विशेष संध्याकाळचे आयोजन केले होते. दिव्यांग व्यक्ती, समावेश आणि सामायिक मानवी मूल्यांना हा कार्यक्रम समर्पित होता. या भव्य, प्रेरणादायी कार्यक्रमाला युएईचे नेतृत्व, समुदायाचे प्रतिनिधी, कुटुंबे आणि हितचिंतकांसह 500  हून अधिक पाहुणे उपस्थित होते.

1 / 6
15 वर्षांचे  अमिराती पियानोवादक आणि संगीतकार अहमद अल हाशिमी यांचे मनमोहक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होतं. तो ऑटिझम स्पेक्ट्रममधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित तरुण कलाकार आहे. त्याने आठ कलाकृती सादर केल्या, ज्यात त्याच्या मूळ रचना आणि बीथोव्हेनच्या शास्त्रीय कलाकृतींचा देखील समावेश होता.

2 / 6
या मंदिरासाठी रचलेला त्यांचा "डार्क टू लाईट" हा विशेष कार्यक्रम मानवतेच्या आव्हानापासून शांतीकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतीक होता.  "माझ्या संगीताचा संदेश प्रेम, शांती आणि सुसंवाद आहे. जेव्हा आपण खरोखर एकमेकांचे ऐकतो तेव्हा जग एक दयाळू ठिकाण बनतं. सहिष्णुता दिनापूर्वी, मला हा संदेश शेअर करताना आनंद होत आहे,”  असं अहमद म्हणाले.

3 / 6
 या कार्यक्रमातील सत्राच्या मध्यात, बीएपीएस हिंदू मंदिर अबू धाबीचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी संगीताच्या परिवर्तनीय शक्तीवर आणि अपंग लोकांच्या धैर्यावर प्रकाश टाकला. समावेश, सक्षमीकरण आणि मानवी प्रतिष्ठेसाठी सातत्याने वचनबद्ध असलेल्या यूएई नेतृत्वाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

4 / 6
यावेळी मंदिरातर्फे अहमद यांना श्रद्धा, कला आणि मानवी आत्म्याच्या मिलनाचे प्रतीक असलेले एक विशेष स्मृतिचिन्ह भेट देण्यात आलं. अहमद यांची आई इमान अलअलीली यांनाही त्यांच्या समर्पणाबद्दल सन्मानित करण्यात आले. युएई नेतृत्व आणि समुदायातील अनेक प्रमुख सदस्य - ब्रिगेडियर हमेद, महामहिम मुबारक अल अमरी, महामहिम मोहम्मद अल बलुशी, श्री झुबिन करकरिया आणि डॉ. विबू बोस - यांना त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल गौरविण्यात आले.

5 / 6
या सुंदर  कार्यक्रमानंतर, अपंग व्यक्ती, यूएई नेतृत्व आणि पाहुण्यांमधील आनंदी आणि समान संवादामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले.  जिथे प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, प्रोत्साहन आणि उन्नती केली जाते ही मंदिराची भूमिका या खास संध्याकाळी  पुन्हा अधोरेखित झाली.

6 / 6
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला