Best Mileage Bikes: दिवाळीत खरेदी करा या जादा मायलेजच्या 5 स्वस्त मोटारसायकल, किंमत ८० हजाराहून कमी…
Best Mileage Bikes: यंदाच्या दिवाळीत तुम्ही 75 kmpl पर्यंतचा मायलेज देणाऱ्या या 5 बाईकपैकी एक बाईक तुम्ही खरेदी करु शकता. Bajaj Platina, Hero HF Deluxe आणि Honda Shine 100 ची किंमत 80 हजार रुपयांहून कमी आहे.

बजेटची बाईक सेगमेंटमध्ये हिरो स्प्लेंडर प्लस बाईकचे नाव सर्वात पुढे आहे. ही देशातील सर्वात विश्वासार्ह मोटरसायकल मानली जाते. हीचे शानदार इंजिन आणि आरामदायी राईड प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबाची पसंद आहे. या बाईकची कमी किंमत आणि सोपे फायनान्स पर्याय ग्राहकांसाठी फायद्याचा सौदा आहेत.
मायलेजचा विचार करता बजाज प्लेटिना १०० या सेगमेंटमध्ये सर्वांना टक्कर देते.कंपनीच्या दाव्यानुसार ७५ किलोमीटर प्रति लिटरचे शानदार मायलेज याला मिळतो. तसेच हिचे आरामदायक सस्पेंशन खराब रस्त्यांवरही पाठीला दुखापत करत नाही. त्यामुळे लांबचा प्रवास आरामात होतो.
टीव्हीएस रेडियन आपल्या मजबूत बिल्ड आणि क्लासिक लूकसाठी तरुणात लोकप्रिय आहे. यातील आरामदायक सिट आणि स्टायलिश हॅलोजन हेडलँप हीला एक प्रिमियम कम्युटर बाईकचा लूक देतात. हीची माफक किंमत आणि चांगला फ्युएल एफिशियन्सी हिला रोजच्या प्रवासासाठी उपयोगी ठरवते.
हीरो एचएफ डीलक्स ज्यांना कमी किंमतीत जास्त मायलेज हवे त्यांच्यासाठी वरदान आहे. हीची सुरुदवातीची किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे शहरातील छोट्या गल्ल्यांपासून कच्च्या रस्त्यांवर देखील ही बाईक शानदार परफॉर्मंन्स देते.
होंडा शाईन १०० बाईकने तिच्या जपानी टेक्नॉलॉजीने कमी इंधनात जोरदार कामगिरी ग्राहकांना पसंद आहे. हीचे रिफाईंड इंजिन कोणत्याही कंपनाविना स्मूथ रायडिंगचा अनुभव देते. कमी किंमतीत विश्वासार्ह बाईक हवी तर होंडा शाईन १०० एक उत्तम बाईक आहे.
या सर्व बाईकची ऑन रोड किंमत ८०,००० रुपयांच्या बजेटमध्ये सहज बसते. मध्यम वर्गीयांसाठी आणि दैनंदिन वापरासाठी या दूचाकी उत्तम आहेत. एकदा टाकी फूल केली की वारंवार पेट्रोल पंपाची चक्कर मारावी लागत नाही. आणि महिन्याचे बजेट देखील बिघडत नाही.