
बिल गेट्स (Bill Gates) आणि मेलिंडा फ्रेंच (Melinda French) यांनी विवाहाच्या 27 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचे घोषित केले तेव्हा या बातम्यांनी इंटरनेटवर एकाच खळबळ उडाली. याची घोषणा करताना त्यांनी म्हटले की,"यापुढे आपल्या आयुष्याच्या या पुढच्या टप्प्यात आम्ही जोडीने एकत्र जाऊ शकत नाही", मात्र त्यांचे बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये काम करणे सुरूच राहणार आहे. एका रिपोर्टनुसार, बिल गेट्स यांनी आपली माजी प्रेयसी अॅन विनब्लाड (Ann Winblad) हिला दरवर्षी भेटण्यासाठी पत्नीबरोबर एक 'करार' केला होता.

बिल गेट्स यांनी मेलिंडा फ्रेंच यांच्याशी लग्न करण्यापूर्वी 1994मध्ये अॅन विनब्लाड यांना डेट केले होते. इतकेच नव्हे तर लग्नानंतरदेखील पूर्व प्रेयसीला भेटण्यासाठी, तिच्यासोबत वर्षातून एक दीर्घ सुट्टी साजरी करण्यासाठी मेलिंडासोबत त्यांनी एक करार केला होता.

मेलिंडा यांच्याशी विवाह करण्यापूर्वी बिल गेट्स यांनी अॅन विनब्लाडचा सल्ला घेतला होता. तिला विचारल्यानंतर, परवानगी घेतल्यानंतरच त्यांनी मेलिंडा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतरही हे दोघे एकमेकांना वर्षातून एकदा भेटत असत. या दरम्यान ते दोघांसाठी समुद्र किनारी बांधलेल्या एका बंगल्यात जाऊन राहत.

द पोस्टच्या रिपोर्टनुसार अॅन विनब्लाड यांनी देखील सॅन फ्रान्सिस्कोचे खासगी अन्वेषक एडवर्ड अॅलेक्स क्लेन यांच्याशी लग्न केले आहे. एडवर्ड अॅलेक्स क्लेन हे गुन्हे, फसवणूक आणि नागरी हक्कांवरील खटल्यांची चौकशी करणारे 'अॅलेक्स क्लेन इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्च सर्व्हिस'चे मालकही आहेत.

अॅन विन्ब्लाड या एक सॉफ्टवेअर उद्योजिक आहे. बिल गेट्स यांनी अॅन यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामधील समुद्र किनाऱ्याजवळ आरामदायक बीच कॉटेज देखील बांधली आहे. 1997मध्ये बिल गेट्स यांनी टाईम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, अॅनबरोबर लॉन्ग वीकेंडला जाण्याची परवानगी त्यांना मेलिंडा यांनी दिली होती. असेही म्हटले जाते की, विन्ब्लाडने बिल गेट्स यांना मेलिंडाला लग्नाचा प्रस्ताव देण्याची परवानगी दिली होती.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांच्या घटस्फोटानंतर आता ‘अॅन’ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या दोघांच्या नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह लावले जात आहेत. तसेच, लग्नानंतर देखील त्यांनी हे नाते का पुढे नेले? हीच गोष्ट त्यांच्या घटस्फोटा कारणीभूत ठरली असावी का? असे अनेक प्रश्न जगभरातून उपस्थित केले जात आहेत.