PHOTO : राज्यात वीज तोडणी, वीज मंत्र्यांच्या घरात मात्र झगमगाट, नितीन राऊतांवरुन भाजपनं पुन्हा ठाकरे सरकारला घेरलं

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरात झगमगाट पाहायला मिळत आहे, असा टोला भाजपने लगावला आहे. (BJP Criticism Nitin Raut House Lighting)

1/6
राज्यात वाढीव वीजबिलानंतर आता वीज तोडणीवरुन भाजप आक्रमक झाला आहे. राज्यात वीज तोडणी सुरु  आहे. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरात झगमगाट पाहायला मिळत आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.

2/6
भाजप महाराष्ट्र या अधिकृत पेजवरुन नितीन राऊतांच्या घराचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे. या  फोटोत नितीन राऊतांच्या घराच्या आत लाईटचा झगमगाट पाहायला मिळत आहे.

3/6
आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना... हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं, असे ट्वीट भाजपने केले आहे. या ट्वीटवरुन भाजपने ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

4/6
या ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी ! अशी टीकाही भाजपने केली आहे.

5/6
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 2 मार्चला विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. त्यानंतर आठ दिवसांत हा निर्णय बदलण्यात आला.

6/6
ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे, अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI