
चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे कठीण भूमिका साकारण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतो. सोबतच त्यासाठी मेहनतही करावी लागते. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे दिव्या खोसला. आपल्या अपकमिंग फिल्मच्या रोलसाठी तिने एक मोठ पाऊल उचललय. अलीकडेच तिने या बद्दल सोशल मीडियावर खुलासा केला. त्यामुळे सगळेच हैराण आहेत.

दिव्या खोसला आपला अपकमिंग चित्रपट 'एक चतुर नार' च्या रिलीजच्या तयारीमध्ये आहे. अलीकडेच तिने खुलासा केला की, ती तिच्या अपकमिंगच्या रोलच्या तयारीसाठी लखनऊच्या चाळीत राहत होती. जेणेकरुन भूमिका व्यवस्थित वटवता यावी.

अभिनेत्रीने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर चित्रपटाची एक झलक सादर केली. सोबतच लिहिलं की, 'एक चतुर नार' मधील आपली व्यक्तीरेखा समजून घेण्यासाठी झोपडपट्टीवासियांच जीवन समजून घेण्यासाठी लखनऊच्या एका झोपडीत राहिली.

आयुष्याची दुसरी बाजू समजून घेणं तो बदल समजून घेऊन तसं जगणं एक वेगळा अनुभव असतो. आतापर्यंत लोकांनी दिव्याला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनला एक ग्लॅमरस एक्ट्रेस म्हणून पाहिलं आहे. तिला आता नव्या रोलमध्ये पाहणं एक कमालीचा अनुभव असणार आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज होतोय.

दिव्या खोसला टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. भूषण कुमार यांच्याबद्दल बोलायच झाल्यास त्यांची फॅमिली बॉलीवुड कुटुंबांच्या लिस्टमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, त्यांच्या कुटुंबाकडे 10,000 कोटीची संपत्ती आहे.