Raveena Tandon : रवीना टंडनकडून 28 वर्षांपूर्वी मोठी चूक, आता तिच्याकडून खुलासा

Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनने बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. प्रत्येक रोलमध्ये तिने आपली छाप उमटवली आहे. करिअर ऐन भरात असताना रवीना टंडनने एक मोठा चित्रपट नाकारलेला. त्या बद्दल तिने आता खुलासा केलाय.

| Updated on: Feb 17, 2026 | 5:03 PM
1 / 5
रवीन टंडन 90 च्या दशकातील बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यावेळी ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री होती. रवीन टंडन त्याकाळी डान्सपासून अभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना टक्कर द्यायची. आजही रवीना टंडनचा जलवा कायम आहे.

2 / 5
अलीकडेच रवीन टंडनने झूम टीव्हीला इंटरव्यू दिला. या चर्चेमध्ये तिने सांगितलं की, वर्ष 1998 मध्ये तिने करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट रिजेक्ट केला होता.  हा चित्रपट दुसरा तिसरा नसून  'कुछ कुछ होता है' आहे.

3 / 5
करण जोहरच्या डायरेक्टोरियल डेब्यू फिल्म 'कुछ कुछ होता है' मध्ये तिला एक रोल ऑफर झालेला. पण त्यावेळी मी नकार दिला असं रवीनाने सांगितलं. रवीना टंडनला 'कुछ कुछ होता है' मध्ये राणी मुखर्जीचा टिनाचा रोल ऑफर झालेला. पण तिने नकार दिला.

4 / 5
 शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'कुछ कुछ होता है' चा रोल नाकारल्याबद्दल करण जोहर आजही तिच्यावर नाराज आहे. रवीन टंडन म्हणाली की, करण सोबतची माझी मैत्री महत्वाची आहे. पण त्यावेळी मी हा रोल नाकारला. कारण मला करिअरच्या त्या स्टेजवर सपोर्टिंग रोल किंवा सेकंड लीड रोल करायचे नव्हते.

5 / 5
सपोर्टिंग रोलमध्ये प्रवास सुरु करण्याऐवजी तिला सोलो लीड रोल मध्ये स्वत:ला सिद्ध करायचं होतं, असं रवीनाने सांगितलं. काही फिल्मस रिजेक्ट करण्यामागे माझी स्वत:ची कारणं होती. जसा की कुछ कुछ होता हैं, करण मला नेहमी म्हणतो की तू माझा पहिला चित्रपट केला नाहीस. पण 'मोहरा'नंतर मला करिअर रिस्टार्ट करायचं होतं. ते ही सोलो हिरॉईन बनून. म्हणून मी करणचा तो चित्रपट केला नाही.