Tumbbad 2: प्रियांका, कतरिना नाहीतर, सोहम शाहच्या ‘तुंबाड 2’ सिनेमात 1200 कोटींच्या अभिनेत्रीची एन्ट्री
Tumbbad 2: 'तुंबाड 2' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर... कोणती अभिनेत्री सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका... 1200 कोटींच्या अभिनेत्रीचं नाव समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाचीच चर्चा रंगील आहे.....

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड' सिनेमाच्या दुसऱ्या भागावर काम सुरु आहे. सिनेमा यंदाच्या वर्षी नाही तर, 3 डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी देखील सिनेमाबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदेश प्रसाद यांच्यानर आहे.

सिनेमात सोहम शहा मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची देखील महत्त्वाची भूमिका आहे... दोघांचा एक फोटो देखील समोर आला आहे... एवंढच नाही तर, सिनेमात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे, याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे.

नुकताच असं समोर आलं की, सिनेमातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि नयनतारा या तीन अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. मात्र, त्या सर्वांना मागे टाकत, 1200 कोटींची कमाई करणाऱ्या या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुटिंगची तयारी सध्या मुंबईत सुरु आहे, सिनेमात आलिया हिती भूमिका लहान असली, तरी महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया 3 मे रोजी शुटिंग करणार आहे.

दोन दिवसांत अभिनेत्री तिची शुटिंग पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे... सांगायचं झालं तर, राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमात आलिया भट्टची छोटी भूमिका होती, ज्याने जगभरात 1200 कोटी रुपयांची कमाई केली. म्हणून आलिया हिला '1200 कोटी रुपयांची अभिनेत्री' म्हणूनही ओळखलं जातं.