
केरळ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून विजय बाबूविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 22 एप्रिल रोजी तक्रार मिळाली होती, त्यानंतर त्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चित्रपटात काम देतो असे सांगत अभिनेता विजय बाबूने महिलेवर एकवेळा नव्हे तर अनेकवेळा अत्याचार केला आहे. महिलेन दिलेल्या माहितीनुसार अभिनेता विजय बाबू याने कोची येथील फ्लॅटमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले विजय बाबू हे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले अभिनेता व निर्माता आहे. अभिनेत्याचे 'फ्रायडे फिल्म हाऊस' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

या आरोपांनंतर मल्याळम सुपरस्टार विजय बाबू यांनी आपले मत व्यक्त केले व्यक्त केले आहे. विजय बाबूने आपल्या फेसबुक लाईव्हवर सांगितले की, "मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे मी घाबरत देखील नाही. इथे मी पीडित आहे, 2018 पासून माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला मी ओळखतो.