‘चिकन’चा हा पार्ट म्हणजे बिअरसोबत सर्वात बेस्ट चकणा
चिकनचा एक असा पार्ट, जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. कुरकुरीत तळलेले असोत किंवा ग्रील केलेले, वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये तयार केलेला हा पदार्थ खाण्याची मजाच काही और आहे.

चिकन विंग्स (Chicken Wings) हा बिअरसोबत, दारुसोबत चकणा म्हणून खाण्यासाठी एक उत्तम आणि अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. चिकनच्या या भागाला वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून तळले किंवा ग्रील केले जाते.
लहान आकाराचे असल्यामुळे आणि हाताने सहज पकडून खाता येत असल्यामुळे गप्पा मारताना किंवा ड्रिंक्ससोबत खाण्यासाठी हे सोयीचे असतात. त्यामुळे प्लेटमध्ये ठेवून मित्रांसोबत सहज शेअरही करता येतात.
पेरी-पेरी, बार्बेक्यू, तंदूरी, शेझवान किंवा साधे क्रिस्पी तळलेले विंग्स बिअर किंवा कोणत्याही ड्रिंकसोबत उत्तम लागतात. वेगवेगळ्या चवींचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार त्यांची निवड करू शकतो.
हे तळलेले किंवा ग्रील केलेले चिकव असल्यामुळे ड्रिंक्ससोबत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे हलक्या स्नॅक्सऐवजी अनेकजण हा पर्याय निवडतात.
जर तुम्ही तळलेले आणि खूप तिखट विंग्स खात असाल, तर सोबत थोडे सॅलड किंवा काकडी-गाजर ठेवावे. यामुळे जेवणात भाज्यांचाही समावेश होतो आणि तिखटपणा कमी जाणवतो. टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्याची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मद्यामुळे यकृत खराब होते