
मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस मध्यंतरी अमेरिकेत राहत होती. आता ती पुन्हा भारतात आली आहे. भारतात आल्यानंतर मृणालने तिचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.

मृणाल दुसानिसने स्वत: रेस्टॉरंट सुरु केलं आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये मृणालचं हे नवं रेस्टॉरंट सुरु केलंय. 'बेली लाफ्स' हे रेस्टॉरंट सुरु केलंय.

नुकतंच मृणालच्या या नव्या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं. यावेळी तिचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मृणाल दुसानिसची स्टार प्रवाहवरील‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर मृणाल मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

येत्या 16 डिसेंबरपासून ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जरा हटके अशी ही मालिकेची गोष्ट आहे. या मालिकेत ज्ञानदा रामतिर्थकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे हे कलाकार मुख्य भुमिकेत असणार आहेत.