अभिनेत्री जिया खानचा मृत्यू, सूरज पांचोलीला अटक, 9 वर्षे जुनी बॉलिवूडची भळभळती जखम

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात तिच्या मृत्यूची ती भळभळती जखम...

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 8:10 AM
1 / 5
20 फेब्रुवारी 1988 साली जिया खान हिचा जन्म न्यूयॉर्कमधल्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. जियाचं खरं नाव नफिसा खान होतं. जियाने बालकलाकार म्हणून कामाला सुरूवात केली आणि नंतर तिने काही सिनेमांमध्येही काम केलं.

2 / 5
1998 मध्ये जियाने दिलसे या चित्रपटात काम केलं. यात तिने बालकराकाराची भूमिका केली. त्यानंतर निशब्द या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. 2008 मध्ये आलेल्या गजनी चित्रपटात जिया खानने काम केलं. 2010 मध्ये आलेल्या हाऊसफुल सिनेमातही ती दिसली होती. हा तिचा अखेरचा चित्रपट ठरला.

3 / 5
जिया खानच्या कामाची जशी चर्चा झाली तसंच तिच्या मृत्यूबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले गेले. 3 जून 2013 ला जिया खानच्या जुहूतल्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. जियाचं वय केवळ 25 वर्षे होतं. तिच्या जाण्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या.

4 / 5
जियाची आई राबिया खान यांनी जियाचा कथित बॉयफ्रेंड सूरज पांचोलीच्या विरोधात तक्रार केली. सूरजमुळेच जियाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं जियाची आई आणि इतर कुटुंबियांचं म्हणणं होतं. त्यामुळे सूरज पांचोलीला अटक झाली होती.

5 / 5
जिया खानचा मृत्यू ही बॉलिवूडची भळभळती जखम आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जियाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं होतं. जियाचं इतक्या कमी वयात जगाचा निरोप घेणं अनेकांना भळभळती जखम देऊन गेलं.