आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?
आयमॅक्स फॉरमॅट चित्रपटांसाठी खास वेगळ्या धर्तीची सिनेमागृहे लागतात.आयमॅक्स कॅमेरे आणि प्रक्षेपकही वेगळे असतता. ख्रिस्तोफर नोलन यांचा 'दि ओडिसी' देखील आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञानाने चित्रित झालेला चित्रपट आहे. आयमॅक्स तंत्रज्ञान नेमके काय आहे ? हे पाहूयात...

आयमॅक्स चित्रपट चित्रपट फिल्म रिळावर चित्रित केला जातो.या चित्रफितीत जास्तीत जास्त आकाराच्या प्रतिमा सामावून घेण्याची विशेष क्षमता असते.आयमॅक्सवर चित्रित केलेला सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी वेगळे प्रोजेक्टर लागते.अति भव्य पडदा आणि स्वतंत्र क्षमता असणारे चित्रपट गृह लागते.

सर्वसाधारण चित्रपट ३५ मिलीमीटर चित्रफीतीवर चित्रित होतात. प्रत्येक फ्रेम २१.९५ मिमी बाय १८.६ मिमी या मापाची असते.आयमॅक्स फिल्मची चौकट ७० मिमी बाय ४८.५ मिमी या मापाची असते.

आयमॅक्स चित्रफितीवर दृश्य चित्रित करण्यासाठी स्पेशल आयमॅक्स कॅमेऱ्यांची गरज असते.आयमॅक्स कॅमेऱ्यात मिनिटाला १०३ मीटर वेगाने चित्रफीत पुढे सरकते. हा वेग नेहमीच्या ३५ mm वेगापेक्षा तिप्पट असतो.

ज्यामुळे प्रतिमेचा रेकॉर्डिंगचे रिझोल्युशन नेहमीच्या प्रतिमेपक्षा खूपच जास्त असते. त्यामुळे आयमॅक्स कॅमेऱ्यांना नेहमीच्या कॅमेऱ्यांपेक्षा तीनपट जास्त निगेटिव्हची गरज भासते.

आयमॅक्स थ्रीडी चित्रपटाकरीता आणखी वेगळे तंत्राचे कॅमेरे लागतात. आयमॅक्स कॉर्पोरेशन ही कॅनडाची कंपनी आयमॅक्स चित्रफित चालवणारे GT,GT,3D, SR आणि MPX अशा चार प्रकारचे प्रक्षेपकाची निर्मिती केली आहे.यातील GT प्रक्षेपक वगळता उर्वरित प्रोजक्टर थ्रीडी चित्राचे प्रक्षेपण करु शकतात.आयमॅक्स चित्रफीत डिजिटल आणि लेसर दोन्ही पद्धतीने प्रक्षेपित करता येते.

२०१२ साली आयमॅक्स 4K लेसर पद्धती आणली. त्यामुळे नेहमीचे आयमॅक्स प्रसर गुणोत्तर कायम ठेवून छत्तीस मीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या पडद्यावर चित्रपट प्रक्षेपित करणे शक्य झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी आयमॅक्स तंत्राने अनेक चित्रपट बनवले आहेत. नुकताच रिलीज झालेला 'दि ओडीसी' हा देखील आयमॅक्स पट आहे.

क्लासिक, मल्टीप्लेक्स,डोम, ओम्नीमॅक्स अशी विविध रचना असणारी चित्रपटगृहे आयमॅक्स फॉरमॅटचा चित्रपट दाखवण्यासाठी वापरली जातात.२००८ साली आलेल्या डिजिटल प्रक्षेपण तंत्राने चित्रपटगृहाच्या रचनेत जास्त बदल न करताही केवळ आयमॅक्स डिजिटल प्रक्षेपकाचा वापर करुन साध्या सिनेमागृहातही आयमॅक्स सिनेमा रिलीज करणे शक्य झाले.मात्र, यात मूळ आयमॅक्स सिनेमागृहापेक्षा चांगला परिणाम मिळत नाही.