
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, त्या अभिनेत्याचं नाव आहे कबीर बेदी.. कबीर बेदी यांच्या वैवाहिक आयुष्याची कायम चर्चा रंगलेली असते. कबीर बेदी यांचं पहिलं लग्न १९६९ साली प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. १९७४ मध्ये प्रोतिमा आणि कबीर यांनी घटस्फोट घेतला.

प्रोतिमा आणि कबीर यांना एक मुलगी देखील आहे. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानतंर कबीर यांनी दुसरं लग्न मूळची ब्रिटीश असणाऱ्या फॅशन डिझायनर सुजान हम्प्रेज यांच्या सोबत केलं. पण त्यांचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं.

दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर बेदी यांनी १९९२ साली तिसरं लग्न केलं. टीव्ही आणि रेडियो प्रेजेंटर निक रिड्ससोबत केलं. पण कबीर बेदी यांचं तिसरं लग्न देखील अपयशी ठरलं. तिसऱ्या पत्नीसोबत देखील त्यांचा घटस्फोट झाला.

तीन लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर यांनी चौथं लग्न केलं. कबीर यांनी चौथं लग्न परवीन दुसांज यांच्यासोबत केलं. वयाच्या ७० व्या वर्षी कबीर बेदी यांनी लग्न केलं. कबीर बेदी यंची चौथी पत्नी त्यांच्या लेकी पेक्षा ५ वर्षांनी लहान असं सांगितलं जातं.

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन हिचं वय ४८ वर्ष असून, त्यांची मुलगी पूजा बेदी हिचं वय ५३ वर्ष आहे. पूजा बेदी हिने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आज पूजा झगमगत्या विश्वापासून दूर असते.