करिश्मा तन्ना बांधतेय लग्नगाठ, लग्नाचा शाही थाट, हळदी-मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर

खतरों के खिलाडी 10 ची विजेती अभिनेत्री करिश्मा तन्नाही आज लग्नगाठ बांधतेय. गोव्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 05, 2022 | 1:12 PM
1 / 5
सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. खतरों के खिलाडी 10 ची विजेती अभिनेत्री करिश्मा तन्नाही आज लग्नगाठ बांधतेय. गोव्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. याचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर हळदी आणि मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. हळदीच्या कार्यक्रमावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या कार्यक्रमादरम्यान या दोघांवर फुलांची उधळण करण्यात आली.

3 / 5

करिश्माने मेहेंदीचेही फोटो शेअर केले आहेत. यात तिने तिचा होणारा पती वरुण बंगेरासोबतचे फोटो शेअर केले आहेत. मेहेंदीसाठी तिने पिवळ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे तर वरूणने लाल रंगाचा कुर्ता घातलाय.

4 / 5

करिश्माने घातलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस तिच्या सौंदर्यात भर टाकतोय. या डिझायनर लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमधले खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

5 / 5

करिश्मा मागच्या काही काळापासून वरुण बंगेरासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. या दोघांनी 12 नोव्हेंबर 2021 ला एंगेजमेंट केली आज ते गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करत साता जन्मासाठी लग्नबंधनात अडकत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us