बापरे हा तर सुपरमॅन! किवी प्लेअरनं कॅच घेण्यासाठी अशी डाय घेतली की…,Video व्हायरल
न्यूझीलंडच्या प्लेअरची कॅच घेण्याच्या प्रयत्नामुळे चर्चा रंगली, पण भारताने 226 धावांचे आव्हान पार करत इतिहास घडवला. संजू सॅमसन आणि नमन धीरच्या आक्रमक खेळीनंतर सामन्याचं चित्र कसं बदललं आणि टीम इंडियाने कशी जिंकली?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 4 विकेट्सने बाजी मारली. मात्र, या सामन्यात सुपरमॅन ग्लेन फिलिप्स हा अँगल न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत राहिला. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सामन्यातील चुरस यामुळे हा सामना गाजला. भारताने 2 चेंडू बाकी असताना विजय मिळवत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा यशस्वी रनचेज केला.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या 5.5 षटकांत 93 धावांची भागीदारी केली. संजूने 33 चेंडूंत 67 धावा केल्या, तर अभिषेकने 12 चेंडूंत 29 धावांचे योगदान दिले. मात्र, न्यूझीलंडने लागोपाठ विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला.
तिलक वर्मा आणि इशान किशन यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. अक्षर बाद झाल्यानंतर श्रेयसने नमन धीरसोबत डाव पुढे नेला.
श्रेयस अय्यरने 28 चेंडूंत 42 धावा केल्या. त्याची विकेट पडल्यानंतर नमन धीर आणि नितीश रेड्डी यांनी विजयाची जबाबदारी सांभाळली. नमनने अवघ्या 15 चेंडूंत 42 धावा कुटल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडने 225 धावा केल्यानंतर भारतासाठी हे आव्हान कठीण मानले जात होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत सामन्याचे चित्र बदलले. पहिल्याच टी20 सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
SUPERMAN -Glenn Phillips.✨🥶
#INDvsNZ https://t.co/GuM5ovpeS2
— Nafees (@Nafees_22) October 22, 2026
दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ग्लेन फिलिप्स कॅच पकडण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. पण यामध्ये त्याला काही यश मिळताना दिसत नाही. पण त्याची धडपड आणि डाय पाहून नेटकऱ्यांनी त्याला सुपरमॅन अशी उपमा दिली आहे. भारता आणि न्यूझीलंड यांच्यातील पुढील सामना आता 24 ऑक्टोबर 2026 रोजी क्राइस्टचर्चमधील हेगले ओवल या ठिकाणीच खेळवळा जाणार आहे.
