‘खतरों के खिलाडी 10’ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या…

सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. 'खतरों के खिलाडी 10'ची विजेती अभिनेत्री करिश्माही तन्ना लग्न करतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत करिश्मा आज लग्न करतेय.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 05, 2022 | 3:04 PM
1 / 5
सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. 'खतरों के खिलाडी 10'ची विजेती अभिनेत्री करिश्माही तन्ना लग्न करतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत करिश्मा आज लग्न करतेय.

सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. 'खतरों के खिलाडी 10'ची विजेती अभिनेत्री करिश्माही तन्ना लग्न करतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत करिश्मा आज लग्न करतेय.

2 / 5

करिश्मा तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत आज लग्नगाठ बांधतेय. वरूण हा मुंबईत राहतो. तो एक बिझनेसमन आहे. करिश्मा तन्नासोबत एंगेजमेंट केल्यापासून तो चर्चेत आला. वरुण व्हीबी ग्रुपमध्ये काम करत असल्याची माहिती आहे.

3 / 5

वरुण एका रिअल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून काम करत आहे. कॅनडातील ओटावा इथल्या कार्लटन विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. वरुणने विदेशी विश्वविद्यालयातून इंटरनॅशनल बिजनेस, बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि मैनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे.

4 / 5

वरुण सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. त्यामुळे तो सोशल मीडिया जास्त अॅक्टिव्ह नसतो. त्याने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट ठेवलं आहे.

5 / 5

करिश्मा आणि वरुण एका ओळखीच्या मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मग प्रेम. त्यांनी 12 नोव्हेंबर 2021 ला एंगेजमेंट केली आणि आज ते गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us