
आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना चकित करणारी अभिनेत्री उर्फी जावेदचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीचे काही ड्रेस इतके विचित्र आहेत की, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की, या ड्रेसचा डिझायनर कोण आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच घडला.

जेव्हा इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद ब्लू कलरच्या कटआउट ड्रेसमध्ये सर्वांसमोर उवात्रली होती, तेव्हा देखील अनेकांना प्रश्न पडले. उर्फीचा हा लूक पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. पण सर्वांच्याच मनात एकच प्रश्न होता की, अभिनेत्रीने हे काय परिधान केले आहे? अनेकांनी उर्फीला तिच्या फाटलेल्या ड्रेसच्या डिझायनरचे नाव विचारले होते.

सर्व चाहत्यांचे प्रश्न लक्षात घेऊन उर्फी जावेदने आपल्या नवीन पोस्टमध्ये या ब्लू आउटफिटच्या डिझायनरचा खुलासा केला आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला अनेक लोकांकडून मेसेज आले की या ड्रेसचा डिझायनर कोण आहे. त्याचा फोटो पाहण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा. कृपया त्याला दोष द्या मला नाही.’ Urfi चे कॅप्शन वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच खूप उत्साहाने स्वाइप देखील कराल.

शेवटच्या स्लाईडमध्ये समोर येईल मोठा खुलासा! उर्फी जावेदचा हा ड्रेस डिझायनर आहे चक्क उंदीर मामा! आता तुम्हाला देखील हसू आलेच असेल.. या फोटोत एक उंदीर आहे जो निळ्या रंगाच्या कपड्यावर बसलेला आहे. अर्थात ही सगळीच एक गमंत आहे.