Dharmendra Pradhan : सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?

Dharmendra Pradhan : सध्या सर्वत्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चर्चा आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी दिल्लीत मोठं आंदोलन सुरु आहे. हजारो मुलं रस्त्यावर उतरली आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

| Updated on: Jul 22, 2026 | 8:33 PM
1 / 5
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.  त्यातून यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्याची माहिती समोर आलेली. निवडणूक आयोग आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) समोर सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या वेळी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यातून यांच्याकडे किती संपत्ती आहे? त्याची माहिती समोर आलेली. निवडणूक आयोग आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) समोर सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेली आहे.

2 / 5

निवडणूक प्रतिज्ञापत्रातील उमेदवाराची आर्थिक स्थिती ही अधिकृत माहिती मानली जाते. यात दिलेली माहिती सार्वजनिक रेकॉर्डचा हिस्सा असते. यातून मतदारांना उमेदवारांच्या आर्थिक स्थितीबद्दल पारदर्शक माहिती मिळते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण चल आणि अचल मिळून 6.92 कोटींची संपत्ती आहे.

3 / 5

या संपत्तीमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील जमा पैसा, गुंतवणूक, जमीन, घर वाहन आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या अचल संपत्तीमध्ये निवासी आणि बिगर निवासी अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ओदिशा भुवनेश्वरसह अन्य स्थानांवर त्यांच्या आणि कुटुंबाच्या नावावर जमीन, घर आहे.

4 / 5

या संपत्तीचं मूल्य वेळेबरोबर वाढलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा हा महत्वपूर्ण हिस्सा आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार, सर्व संपत्तीचं विवरण निर्धारित नियमानुसार जाहीर केलं आहे.

5 / 5

धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर विभिन्न बँक खात्यामध्ये रोख रक्कम जमा आहे. त्या शिवाय म्यूचअल फंड आणि जीवन विमा योजनेत गुंतवणूक आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, SBI म्यूचुअल फंडसह त्यांची अन्य आर्थिक गुंतवणूक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us