गॅस सिलिंडरखाली असतो हा खतरनाक कीडा, दुर्लक्ष केल्यास थेट आजारी पडाल; कसं पळवून लावावं?
किचनमध्ये अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलिंडर ठेवलेला असतो. तुम्ही फरशीवर गॅस सिलिंडर ठेवत असाल तर सिलिंडरच्या खालच्या भागात मोकळी जागा असते. याच मोकळ्या जागात अनेक कीटक आपलं घर बनवतात.

किचनमध्ये स्वयंपाकाच्या सामानाव्यतिरिक्त अनेकजण वेगवेगळं सामान ठेवतात. या सामानामुळे किचनमध्ये मोठी अडचण निर्माण होते. परिणामी किचनमध्ये अनेक प्रकारचे छोटे कीटक दिसायला लागतात.
किचनमध्ये अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलिंडर ठेवलेला असतो. तुम्ही फरशीवर गॅस सिलिंडर ठेवत असाल तर सिलिंडरच्या खालच्या भागात मोकळी जागा असते. याच मोकळ्या जागात अनेक कीटक आपलं घर बनवतात.
झुरळ असा कीटक आहे, जो अशा ठिकाणाला हमखास आपले घर बनवतो. ज्या ठिकाणी सिलिंडर ठेवलेले आहे, त्या ठिकाणाची वेळोवेळी सफाई न केल्यास तिथे अनेक झुरळं आपलं घर तयार करू शकतात. पुढच्याच काही दिवसांत या झुरळांची संख्या वाढते.
तुम्ही तयार करत असलेल्या अन्नावर हे झुरळं फिरायला लागतात. परिणामी तुम्हाला अनेक छोटे-मोठे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागू शकते.
म्हणूनच तुमच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून गॅस सिलिंडर ठेवलेल्या जागेची नियमित सफाई करा. तसेच किचनमधील कोपरे, अडगळीची जागाही स्वच्छ ठेवा. यामुळे घरात झुरळं होणार नाहीत आणि तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबाला आजारही होणार नाहीत.