
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'ट्रॅक्टर रॅली'चं आयोजन करण्यात आलंय.

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसनं सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झाली आहे.

'ट्रॅक्टर रॅली'मध्ये महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील सहभागी झाले आहेत.

'ट्रॅक्टर रॅली'चं नेतृत्व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं.यावेळी त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवला.

कोल्हापूरमधील निर्माण चौक येथून या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली असून दसरा चौक येथे रॅलीचा शेवट होईल.

आता आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले.