चिमण्या वारंवार घरात येत आहेत? अत्यंत मोठा अर्थ, थेट तुमच्या आयुष्यात..
बऱ्याचदा दुपारच्यावेळी चिमण्यांचे आवाज येतात. एखादी चिमणी आपल्या घरातही येते. मात्र, चिमणी घरात घरटे करेल म्हणून आपण चिमणीला लगेचच उडवून देतो. जर तुम्हीही असे करत असाल तर आजच सावध व्हा.

बऱ्याचदा घरात चिमण्या येतात. मात्र, घरात चिमण्या घरटे तयार करतील म्हणून आपण त्यांना उडवून लावतो. हे करणे अतिशय अशुभ आहे. जर तुमच्या घरात चिमण्या येत असतील तर ते खूप जास्त शुभ आहे. घरात चिमण्या येत असतील तर ते शुभ संकेत असतात. आजकाल चिमण्या फार काही दिसत नाहीत, अशातच आपल्या घरात चिमण्यात येत असतील तर त्याचा मुख्य संकेत आहे की, घरात पैसा येणार आहे. घरात लक्ष्मी येण्याचा पहिला मोठा संकेत म्हणजे घरात चिमण्या येणे आहे. जर घरात चिमण्या घर करत असतील तर करू द्या. त्यामुळे घरात अनेक शुभ गोष्टी घडण्यास सुरूवात होईल. घरात जर शुभ कार्य असेल तर चिमण्यांना घराबाहेर काढू नका, उलट चिमणाचा घरात सहवास असायला हवा.
चिमणी तुमच्या घरात काही सेकंदासाठीही आली तरीही खूप जास्त मोठे शुभ संकेत आहेत. घरात आलेल्या चिमणीला तुम्ही उडवून घरातून काढत असला तर हे खूप जास्त अशुभ आहे. यामुळे आपल्या आयुष्यात समस्याही येऊ शकतात. जर चिमण्यांचे जोडपे घरात येत असेल तर ते अत्यंत शुभ असून त्यावरून घरात लवकरच लग्न जमण्याचे संकेत आहेत. चिमणी घरात आल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडेल.
चिमण्या प्रामुख्याने तांदळाचा चुरा आणि बारीक ज्वारी खातात. घरात आलेल्या चिमण्यांसाठी तांदुळ आणि ज्वारी टाका किंवा बाल्कनीत वगैरे आपण चिमण्यांना खाण्यासाठी एखादा डबा वगैरे ठेऊ शकतो. चिमण्यांमुळे कोणतेही आजार आपल्याला होत नाहीत. आपल्या घरातील अन्न चिमणीने खाणे अत्यंत शुभ आहे. चिमण्यांची प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या धोक्यात आहे.
शहरीकरण, हिरवळ नष्ट होणे, रसायनांवर आधारित शेती आणि सेल टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या चुंबकीय लाटा ही त्यांच्या नामशेष होण्याची कारणे आहेत. जरी चिमण्या घरात आल्या किंवा घरटे बांधले तरी ते शुभ असते. त्यांना हाकलून लावण्याचा, त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका. अधात्मामध्येही स्पष्ट सांगण्यात आले की, घरात चिमणी येणे खूप जास्त शुभ आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
