AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway booking fare : जर संपूर्ण रेल्वेच बुक करायची असेल तर किती पैसे लागतात? तुम्ही अख्खी ट्रेन भाड्याने घेऊ शकता का?

तुम्ही कधी हा विचार केला आहे का की तु्म्ही प्रवासासाठी संपूर्ण ट्रेन बुक करू शकता का? जर एक संपूर्ण रेल्वे बुक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? आणि त्यासाठीचे नियम काय आहेत? आज आपण या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.

Railway booking fare : जर संपूर्ण रेल्वेच बुक करायची असेल तर किती पैसे लागतात? तुम्ही अख्खी ट्रेन भाड्याने घेऊ शकता का?
railwayImage Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Feb 01, 2026 | 11:44 PM
Share

तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केलाच असेल. जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास असतो, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी प्रवासाचं कोणतं साधन येत ते म्हणजे रेल्वे, कारण जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास असतो, तेव्हा बसने असा प्रवास करणं हे म्हणावं तितकं आरामदायी नसतं? तसेच ट्रेनपेक्षा बसचं भाडं देखील अधिक असतं. लांबच्या प्रवासासाठी जेव्हा तुम्ही बसचा पर्याय निवडता तेव्हा अनेक कारणानं ते गैरसोईचं ठरतं, कारण ट्रेनमध्ये ज्या सोई सुविधा तुम्हाला मिळतात, त्या बसच्या प्रवासामध्ये मिळत नाहीत, तसेच ट्रेनचा प्रवास हा कमी खर्चात अधिक आरामदायी होतो, तर बसता प्रवास हा ट्रेनच्या तुलनेत महाग आणि म्हणावा तितका आरामदायी नसतो, बसच्या प्रवासानं तुम्ही थकून जाता, त्यामुळे अनेकदा लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचाच पर्याय निवडला जातो, आता तुम्ही म्हणाल की रेल्वे प्रवासापेक्षा विमानाचा प्रवास हा अधिक आरामदायी असतो, तसेच तुम्ही इच्छितस्थळी देखील लवकर पोहोचता, मात्र विमानाचा प्रवास खर्चाच्या दृष्टीने सर्वांनाच परवडेल असं नाही, विमानाचं भाडं हे खूप जास्त असतं, त्यामुळे आजच्या काळात सर्वसामान्य लोकांना प्रवासासाठी रेल्वेचा मोठा आधार असतो.

जगातील सर्वात जास्त मोठं रेल्वेचं जाळ जर कुठे असेल तर ते भारतामध्ये आहे, काही अपवादा‍त्मक ठिकाणं सोडले तर तुम्ही देशभरात कुठेही रेल्वेने प्रवास करू शकता, ते पण अगदी कमी खर्चामध्ये, सर्वसाधारपणे तुम्हाला कोणत्या ठिकाणावरून कुठे जायचं आहे? त्यावर ट्रेनच्या तिकिटाचे दर अवलंबून असतात, मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जसं तुम्ही ट्रेनमध्ये तुमचं एक सीट आरक्षित करू शकता, तसं संपूर्ण ट्रेन बुक करू शकता का? आणि जर संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर त्यासाठी साधारणपणे किती खर्च येतो? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.

तुम्ही संपूर्ण ट्रेन बुक करू शकता का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही संपूर्ण ट्रेन बुक करू शकता. आता जाणून घेऊयात की जर तुम्हाला संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर त्यासाठी काय नियम आहेत आणि त्यासाठी किती खर्च येतो? जर तुम्हाला एक संपूर्ण ट्रेन बुक करायची असेल तर तुम्हाला 18 डब्यांच्या ट्रेनसाठी 9 ते 10 लाख रुपये इतका खर्च येतो. जर ट्रेनचे डबे अधिक असतील तर हे शुल्क प्रत्येक डब्याप्रमाणे वाढते. तुम्ही जेव्हा संपूर्ण ट्रेन बुक करता तेव्हा ती सात दिवसांठी बुक असते, सात दिवसांसाठी तुमच्याकडून संपूर्ण ट्रेनसाठी 9 ते 10 लाख रुपये भाडं आकारलं जातं. जर तुम्हाला संपूर्ण ट्रेन बुक करायची नसेल आणि एकच डबा बुक करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडून 50 हजार रुपये इतकं भाडं आकारलं जातं. जर सात दिवसांपेक्षा अधिक दिवस वाढले तर त्यासाठी प्रति दिवस तुम्हाला एका कोचसाठी दहा हजार रुपये इतका चार्ज लागतो.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं