AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली

अर्ज करताना, उमेदवारांनी त्यांचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे आवश्यक आहे. वेळेवर अपडेट्स मिळविण्यासाठी वैध ईमेल आयडी आणि सक्रिय मोबाईल नंबर देणे महत्त्वाचे आहे.

RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
RBI JOB
| Updated on: Feb 01, 2026 | 11:53 PM
Share

RBI Office Attendant recruitment 2026: भारतीय रिझर्व्ह बँक म्हणेज आरबीआयमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहात असाल तर मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्व बँकांची शिखर बँक असलेल्या आरबीआयमध्ये ऑफीस अटेडेन्टच्या 572 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली, ही संधी त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांनी १० वी उत्तीर्ण केली आहे आणि सरकारी बँकेत कायमस्वरुपी काम करु इच्छीतात.

आरबीआयने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया 15 जानेवारी 2026 पासून सुरु झाली आहे. आणि शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर rbi.org.in जाऊन अर्ज करु शकतात. केवळ ऑनलाईनच अर्ज स्वीकारले जाणार आहे याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.

या भरतीत ऑफीस अटेंडेन्ट पदासाठी एकूण 572 व्हॅकन्सी काढल्या आहेत. ज्या देशातील विविध शहरे आणि रिजनल ऑफीससाठी आहेत. यात लखनऊ आणि कानपुर रिजनसाठी सर्वाधिक 113 पदांचा समावेश आहे.तर कोलकातासाठी 90 आणि नवी दिल्लीसाठी 61 पदांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई, पाटना, जयपूर, गुवाहाटी, हैदराबाद सारख्या शहरासाठी चांगल्या जागा आहेत.

10 वी उत्तीर्णांना मिळणार संधी

शैक्षणिक अर्हता- उमेदवाराने केवळ मान्यता प्राप्त बोर्डाकडून १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. खास अट म्हणजे १ जानेवारी 2026 पर्यंत उमेदवार ग्रॅज्युएट झालेला नसावा. म्हणजे कॉलेजमधून ग्रॅज्युएशन वा त्याहून जास्त शिकलेला उमेदवार एलिजिबल मानला जाणार नाही. हा नियम आरबीआयने खास करुन या लेव्हलच्या जॉबसाठी तयार केला आहे. वयाचे बंधन 18 ते 25 वर्षांपर्यंत ठेवण्यात आलेले आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना, एक्स सर्व्हीसमन आणि खास कॅटगरीसाठी सरकारच्या नियमानुसार वयात सुट दिलेली आहे.

पगार इतका असेल

या सरकारी नोकरीचा पगार खूपच आकर्षक आहे. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीचा मूळ वेतन २४,२५० रुपये मिळेल. महागाई भत्ता आणि इतर भत्ते जोडल्यास, सुरुवातीचा एकूण पगार दरमहा अंदाजे ४६,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. जर बँकेने निवास व्यवस्था प्रदान केली नाही, तर १५% घरभाडे भत्ता देखील मिळेल.

निवड प्रक्रिया दोन टप्प्यात

निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक ऑनलाईन चाचणी घेतली जाईल, ज्यामध्ये तर्क, सामान्य इंग्रजी, सामान्य जागरूकता आणि संख्यात्मक क्षमता यावरील प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असतील. ऑनलाईन चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषेची प्रावीण्य चाचणी द्यावी लागेल. ज्या राज्यासाठी ते अर्ज करत आहेत त्या राज्याची भाषा वाचणे, लिहिणे आणि बोलणे येण्याची गरजेचे आहे.

Follow Us
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.